महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:52 IST2025-10-02T09:51:44+5:302025-10-02T09:52:32+5:30
Mahatma Gandhi Great Granddaughter : गांधी जयंतीसारख्या प्रसंगी जेव्हा देश त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो, तेव्हा लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि वंशजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याच कुटुंबातील एक सदस्य आहे, जी भारतात नाही, तर अमेरिकेत राहून पूर्णपणे वेगळे आयुष्य जगत आहे.

महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
आज २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. यंदा बापूंची १५६ वी जयंती (Gandhi Jayanti 2025) साजरी केली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचे विचार, सिद्धांत आणि सत्य-अहिंसेचा मार्ग आजही लोकांसाठी प्रेरणास्रोत आहे. गांधी जयंतीसारख्या प्रसंगी जेव्हा देश त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो, तेव्हा लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि वंशजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याच कुटुंबातील एक सदस्य आहे, जी भारतात नाही, तर अमेरिकेत राहून पूर्णपणे वेगळे आयुष्य जगत आहे.
आम्ही महात्मा गांधी यांची पणती (Mahatma Gandhi Great Granddaughter) मेधा गांधी (Medha Gandhi) यांच्याबद्दल बोलत आहोत, ज्या बापूंच्या पाचव्या पिढीतील आहेत. मेधा ह्या महात्मा गांधी यांचे थोरले चिरंजीव हरिलाल गांधी यांच्या वंशज आहेत. हरिलाल यांचे पुत्र कांतीलाल गांधी हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते आणि दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधींसोबत खांद्याला खांदा लावून चालले होते. असे म्हटले जाते की, वयाच्या २० व्या वर्षी कांतीलाल बापूंच्या पुढे चालून त्यांचे सामान उचलत असत. कांतीलाल यांचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि तिथेच मेधा गांधी यांचा जन्म आणि लहानाच्या मोठ्या झाल्या.
मेधा गांधी काय करतात?
मेधा गांधी अमेरिकेत एक प्रतिभावंत कलाकार आहेत. त्या पेशाने लेखिका, निर्माती आणि गायिका आहेत. त्यांनी अमेरिकेतील 'डेव्ह अँड शो' आणि 'मॅटी इन द मॉर्निंग शो' सारख्या अनेक प्रसिद्ध रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. याशिवाय त्या 'एल्विश ड्यूरान अँड द मॉर्निंग शो'च्या होस्ट देखील आहेत, जो अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे.
मेधा यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. त्यांचे इंस्टाग्रामवर जवळपास अडीच लाख फॉलोअर्स आहेत आणि त्या आपले खास क्षण नेहमी शेअर करत असतात. त्यांचा फॅशन आणि जीवनशैली पूर्णपणे पाश्चात्त्य संस्कृतीने प्रभावित आहे, ज्यामुळे त्यांची ओळख त्यांचे पूर्वज महात्मा गांधी यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तरीही, त्यांच्या नावामागे 'गांधी' हे नाव जोडलेले असणे आजही खास महत्त्व ठेवते.
या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत मेधा
मेधा आपल्या नात्याबद्दलही खूप मोकळ्या विचारांच्या आहेत. त्या ब्रँडेन जोन्ससोबत रिलेशनशीपमध्ये आहेत आणि अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो आणि क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. जिथे बापू आयुष्यभर साधेपणाचा मार्ग निवडत राहिले, तिथे त्यांच्या पणतीने ग्लॅमरच्या जगात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.