ग्वेन स्टेफनीशी घेतलेल्या घटस्फोटाचा गेविन रोसडेलला होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 18:51 IST2017-03-04T13:20:57+5:302017-03-04T18:51:56+5:30

संगीतकार गेविन रोसडेल आणि त्याची पत्नी ग्वेन स्टेफनी यांनी गेल्यावर्षी एप्र्रिल महिन्यात घटस्फोट घेत वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. मात्र ...

Gwen Stephanie's divorce is due to Gavin Rosendale's repentance | ग्वेन स्टेफनीशी घेतलेल्या घटस्फोटाचा गेविन रोसडेलला होतोय पश्चाताप

ग्वेन स्टेफनीशी घेतलेल्या घटस्फोटाचा गेविन रोसडेलला होतोय पश्चाताप

गीतकार गेविन रोसडेल आणि त्याची पत्नी ग्वेन स्टेफनी यांनी गेल्यावर्षी एप्र्रिल महिन्यात घटस्फोट घेत वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. मात्र ग्वेन स्टेफनीच्या आठवणी रोसडेल अजूनही अस्वस्थ करीत आहेत. तो ग्वेनच्या आठवणीत असा काही रममाण होत आहे की, त्याला तिच्यापासून दूर जाण्याचा अक्षरश: पश्चाताप होत आहे. याबाबत त्याने म्हटले की, ग्वेनशी घटस्फोट घेण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. ग्वेन स्टेफनीपासून रोसडेलला ‘किंग्सटन (१०), जुमा (८) आणि अपोलो (३) नावाचे तीन मुले आहेत. 



यूएसमॅगझिन या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार रोसडेलने सांगितले की, असा मीच नव्हे तर ग्वेननेसुद्धा विचार केला नव्हता. एकमेकांपासून दूर जाणे खूपच दु:खदायक असून, त्याचा मला दररोज त्रास होत आहे. सध्या मी ज्या पद्धतीच्या यातना भोगत आहे, त्यातून मला आयुष्याचा खरा अर्थ उमजला आहे. तब्बल १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर विभक्त होणे असा मनात विचार येणेच मुळात विचित्र आहे. ग्वेनपासून मी दूर जाईल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असेही रोसडेलने साांगितले. 



पुढे बोलताना रोसडेलने म्हटले की, आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेलो आहोत. माझ्या आई-वडिलांनी एक दुसºयांसोबतच तब्बल तीन वेळा लग्न केले. त्या तुलनेत मी कुठेच नाही. मी ग्वेनशी लग्न करून तब्बल १३ वर्षे एकत्र संसार केला. आम्ही घटस्फोटापर्यंत कसे पोहोचलो हे कधी कळालेच नाही. रोसडेलचा येत्या १० मार्च रोजी नवा अल्बम ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ रिलिज होणार आहे. त्यानिमित्त तो विविध ठिकाणी जात असून, ग्वेन सोबतच्या आठवणींना वाट मोकळी करून देत आहे. 

Web Title: Gwen Stephanie's divorce is due to Gavin Rosendale's repentance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.