First look : ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या सिक्वलची पहा पहिली झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 21:47 IST2017-03-11T16:17:57+5:302017-03-11T21:47:57+5:30
‘जुरासिक वर्ल्ड’ या सुपरहिट सिनेमाचा सिक्वल २०१८ मध्ये रिलीज होणार असून, त्याची अधिकृत झलक पोस्टरच्या माध्यमातून नुकतीच शेअर करण्यात ...

First look : ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या सिक्वलची पहा पहिली झलक!
‘ ुरासिक वर्ल्ड’ या सुपरहिट सिनेमाचा सिक्वल २०१८ मध्ये रिलीज होणार असून, त्याची अधिकृत झलक पोस्टरच्या माध्यमातून नुकतीच शेअर करण्यात आली आहे. पोस्टरवरून सिनेमात नेमके काय दाखविले जाण्याची शक्यता आहे, याचा काहिसा अंदाज बांधणे शक्य होत असल्याने, हे पोस्टर रोमांच निर्माण करणारे ठरत आहे.
पोस्टरमध्ये एक लहान मुलगी म्युझियममध्ये उभी असल्याचे दिसत आहे. तिच्या आजूबाजूला डायनासोरचे सांगाडे दिसत असून, काहीसे भयावह वाटत आहेत. सिनेमात क्रिस प्रेट आणि ब्रायस डलास यांच्या या भागातही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही रोमांचक असेल यात शंका नाही. त्याचबरोबर बी. डी. वोंग, टोबी जोन्स, डेट लीवाइन, जेम्स क्रोमवेल, रेफ स्पेल आणि जस्टिस स्मिथ हेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, सिनेमाची स्टोरी लाइन काय असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता असून, त्याचा उलगडा नेमका कधी केला जाईल, याबाबतची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कोलिन ट्रेवोरो यांनी ज्युरासिक वर्ल्डच्या पहिल्या भागाची कथा लिहिली होती. त्यामुळे दुसºया भागाचीही कथा लिहिण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. खरं तर कोलिन ट्रेवोरो यांनी यासाठी कामही सुरू केल्याने, पहिल्या भागाच्या तुलनेत दुसºया भागाची कथा सरस दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
असे म्हटले जात आहे की, दुसरा भाग हा अधिक डार्क आणि भीतीदायक दाखविण्याचा निर्मात्यांचा मनोदय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्युरासिक वर्ल्डचा सिक्वल २२ जून २०१८ मध्ये रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. त्याची तयारी आतापासूनच केली जात असून, त्याची पहिली झलक प्रेक्षकांना बघावयास मिळाली आहे.

Walking in giant footsteps. #JW2pic.twitter.com/fOZrFXp9md— Colin Trevorrow (@colintrevorrow) March 8, 2017 ">http://
}}}}Walking in giant footsteps. #JW2pic.twitter.com/fOZrFXp9md— Colin Trevorrow (@colintrevorrow) March 8, 2017