गायक पीटर आंद्रेची व्यायाम करतानाची ही अजब सवय तुम्हाला माहीत आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 20:14 IST2017-03-01T14:44:38+5:302017-03-01T20:14:38+5:30

फिटनेसचे महत्त्व काय असते, हे एखाद्या सेलिब्रिटीशिवाय दुसरे कोण सांगू शकणार? त्यामुळेच सेलिब्रिटी तासन्तास जीममध्ये घाम गाळताना बघावयास मिळतात. ...

Do you know this strange habit of singing Peter Andrea? | गायक पीटर आंद्रेची व्यायाम करतानाची ही अजब सवय तुम्हाला माहीत आहे काय?

गायक पीटर आंद्रेची व्यायाम करतानाची ही अजब सवय तुम्हाला माहीत आहे काय?

टनेसचे महत्त्व काय असते, हे एखाद्या सेलिब्रिटीशिवाय दुसरे कोण सांगू शकणार? त्यामुळेच सेलिब्रिटी तासन्तास जीममध्ये घाम गाळताना बघावयास मिळतात. यासाठी खास ट्रेनरकडून त्यांना धडे दिले जातात; मात्र गायक पीटर आंद्रे याची जीम मारण्याची सवय जर तुम्ही ऐकली तर तुम्ही अवाक् व्हाल! कारण त्याला चक्क न्यूड होऊन जीम मारणे पसंत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. 



फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय पीटरने गेल्या महिन्यात त्याचा एक अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. याला उत्तर देताना पीटरने म्हटले होते की, जीम मारताना तो सहसा पारंपरिक कपडे परिधान करतो; मात्र कधी-कधी त्याला न्यूड होऊन जीम करायला आवडते. 

पीटरने ‘न्यू’ साप्ताहिकाशी बोलताना सांगितले की, मी जीममध्ये व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळेच माझ्या या आगळ्यावेगळ्या सवयीची लोकांना माहिती झाली. लोक यावर सातत्याने चर्चा करू लागल्याचे मला समजल्यानंतर मी यावर जाहीरपणे खुलासा करणे योग्य समजले. मला खरोखरच जीममध्ये विनाकपड्यांची कसरत करायला आवडते. 



जीममध्ये येण्याअगोदर मेकअप करण्याविषयी जेव्हा पीटरला विचारण्यात आले होते तेव्हा पीटरने सांगितले की, एका ठरावीक मर्यादेपर्यंत मला मेकअप करायला आवडतो. कारण मी फिटनेसविषयीचा अधिक विचार करतो. कधी-कधी तर न्यूड होऊन जीम करण्यात मला अधिक आनंद मिळतो. आता पीटर आंद्रेची ही अजब सवय लोकांना माहीत झाल्यानंतर त्याच्याविषयी येत्या काळात आणखी काय प्रतिक्रिया उमटतील हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Do you know this strange habit of singing Peter Andrea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.