एकदिवस मी यातून पूर्णपणे बाहेर पडेल...! ड्रग्जच्या व्यसनावर बोलली डेमी लोवेटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 11:45 IST2018-08-06T11:44:53+5:302018-08-06T11:45:14+5:30
हॉलिवूड सिंगर डेमी लेवोटो गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे चर्चेत आली होती. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे प्रकृती बिघडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल केले गेले होते.

एकदिवस मी यातून पूर्णपणे बाहेर पडेल...! ड्रग्जच्या व्यसनावर बोलली डेमी लोवेटो!
हॉलिवूड सिंगर डेमी लेवोटो गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे चर्चेत आली होती. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे प्रकृती बिघडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल केले गेले होते. ड्रग्जच्या व्यसनावर डेमी दीर्घकाळापासून उपचार घेत आहे. पण अद्यापही ती हा व्यसनाचा विळखा सोडवू शकलेली नाही.
यापूर्वीही अनेकदा ड्रग्जच्या सेवनानंतर प्रकृती बिघडल्याने तिला रूग्णालयात जावे लागलेय. काही दिवस रूग्णालयात उपचार आणि पुन्हा घरी याला ती सरावली होती. पण आता कदाचित या व्यवसनातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निश्चय तिने केला असावा. तिची ताजी पोस्ट तरी हेच सांगणारी आहे. होय, डेमीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने आपल्या चाहत्यांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
‘मी माझ्या व्यसनांबाबत कधीच काही लपवले नाही़ पण आता मी एक धडा घेतलाय. होय, हा काळासोबत बरा होणारा आजार नाही. हा आजार दूर करण्यासाठी मला स्वत:लाचं प्रयत्न करायचे आहेत. मी परमेश्वराचे आभार मानते की त्याने मला जीवदान दिले. माझे चाहते, माझे कुटुंब, माझी टीम आणि स्टाफ सगळ्यांचे मी आभार मानते. त्यांच्या सहकार्याशिवाय मी आजची ही पोस्ट लिहूचं शकले नसते. या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी मला काही वेळ लागले. या प्रवासात मला तुमची सोबत हवी आहे. एकदिवस नक्की येईल, ज्या दिवशी मी यातून पूर्णपणे बाहेर पडलेली असेल,’ असे तिने लिहिले आहे.