क्रिस प्रॅटला का म्हणतात जेनिफर लॉरेन्सचा पुरुषी अवतार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 04:00 PM2017-01-01T16:00:19+5:302017-01-01T16:00:19+5:30

क्रिस प्रॅट आणि जेनिफर लॉरेन्स यांची ‘पॅसेंजर्स’मधील ‘आॅस्सम’ आॅन स्क्रीन केमिस्ट्री पाहुन तर कोणीही म्हणेल की, ते चंदेरी पडद्यावर ...

Chris Prattala is the man-made incarnation of Jennifer Lawrence? | क्रिस प्रॅटला का म्हणतात जेनिफर लॉरेन्सचा पुरुषी अवतार?

क्रिस प्रॅटला का म्हणतात जेनिफर लॉरेन्सचा पुरुषी अवतार?

googlenewsNext
रिस प्रॅट आणि जेनिफर लॉरेन्स यांची ‘पॅसेंजर्स’मधील ‘आॅस्सम’ आॅन स्क्रीन केमिस्ट्री पाहुन तर कोणीही म्हणेल की, ते चंदेरी पडद्यावर झळकलेल्या सर्वोत्तम जोड्यांपैकी एक आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याविषयी चर्चा सुरू झाली होती.

सायन्स फिक्शन प्रकारातील ही लव्हस्टोरी बनवताना या दोन्ही कलाकारांनी कमालीची मेहनत घेतली. शूटींग दरम्यानचा एक रंजक किस्सा सांगताना क्रिसने सांगितले की, त्याला सेटवर ‘जेनिफर लॉरेन्सचा पुरुषी अवतार’ असे म्हटले जाई. म्हणजे पुरुषांची जेनिफर लॉरेन्स!

आता चार्मिंग, हँडसम, टॅलेंटेड क्रिस प्रॅटला जेनिफरच्या नावाने का चिडवले जायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? त्याचे असे आहे की, शूटींग दरम्यान क्रिस आणि जेनिफर एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. ते सतत एकमेकांची चेष्टा-मस्करी करायचे. चित्रपटाच्या कथेनुसार त्यांना आकांत प्रेमात बुडालेले प्रियकर-प्रेयसी साकारायचे होते.

ते एकमेकांना इतके पुरक आहेत की, दोघांच्या वागण्या-बोलण्यामध्ये काहीच फरक वाटत नाही. म्हणून तर त्याला सेटवर जेनिफरचे पुरूषी रुप म्हणायचे. मात्र जेनिफरला वाटते की, ‘तो माझ्यापेक्षा फार चांगला आहे. माझ्यापेक्षा जास्त मेहनती, समजुतदार आणि आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणारा आहे. त्यामुळे लोकांना जर त्याच्यामधील हे गुण माझ्यातही दिसत असतील चांगलीच गोष्ट आहे.’

क्रिसला याबाबत काय वाटते? तो तर म्हणतो, ‘जेनिफरसारख्या अभिनेत्रीचा पुरुषी अवतार म्हणून घ्यायला नक्कीच आवडते.’ त्यांच्या अशा मैत्रीमुळेच चित्रपटात त्यांची केमिस्ट्री एवढी जबरदस्त वाटत आहे. येत्या ६ जानेवारी रोजी ‘पॅसेंजर्स’ हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांत ३-डीमध्ये  रिलीज होत आहे.

Web Title: Chris Prattala is the man-made incarnation of Jennifer Lawrence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.