२८ वर्षीय अभिनेत्रीने ४३ वर्षांच्या अभिनेत्यासोबत थाटलाय संसार, लग्नाच्या दोन वर्षांनी झाली आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:58 IST2025-10-29T11:55:53+5:302025-10-29T11:58:44+5:30
लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आई बाबा झाले आहेत. दोघांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. जाणून घ्या सविस्तर

२८ वर्षीय अभिनेत्रीने ४३ वर्षांच्या अभिनेत्यासोबत थाटलाय संसार, लग्नाच्या दोन वर्षांनी झाली आई
मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मार्वल युनिव्हर्समधील लोकप्रिय सुपरहिरो 'कॅप्टन अमेरिका'ची भूमिका साकारणारा अभिनेता क्रिस इव्हान्स (Chris Evans) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अल्बा बॅप्टिस्टा (Alba Baptista), यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे सेलिब्रिटी जोडपं आई-बाबा झाले असून त्यांना एक मुलगी झाली आहे.
क्रिस आणि अल्बा यांनी जवळपास दोन वर्षांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं आहे. ही बातमी समोर येताच, जगभरातील त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील मित्रमंडळींनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिस इव्हान्स आणि अल्बा बॅप्टिस्टा यांनी नेहमीच त्यांचं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवलं आहे. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, २४ ऑक्टोबरला त्यांना मुलगी झाली. त्यांनी मुलीचं नाव अल्मा ग्रेस ठेवलं आहे. क्रिसने पत्नी आणि मुलीचं घरी आनंदात स्वागत केलं आहे.
क्रिस आणि अल्हा या दोघांपैकी कोणीही मुलीच्या जन्माबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिली नाहीये. इतकंच नव्हे क्रिस आणि अल्बा या दोघांनीही प्रेग्नंसीची ही खास गोष्ट मीडियापासून दूर ठेवली होती. परंतु अल्बाचे वडील लुईज बॅप्टिस्टा यांनी याविषयी हिंट दिली होती. क्रिस हा ४३ वर्षांचा तर अल्बा २८ वर्षांची आहे. दोघांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. क्रिस आणि अल्बाची ही गुड न्यूज कळताच चाहत्यांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.