ख्रिसमससाठी ब्रॅड मुलांना फक्त चारच तास भेटू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 14:41 IST2016-12-23T14:38:23+5:302016-12-23T14:41:40+5:30

ब्रॅजेलिनाचे ख्रिसमस सेलिब्रिशन हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय असायचे. कारण हे जोडपे सर्व कामे बाजूला सारून मुलांसोबत खास ख्रिसमससाठी वेळ काढत ...

Brad will be able to meet the kids for just four hours for Christmas | ख्रिसमससाठी ब्रॅड मुलांना फक्त चारच तास भेटू शकणार

ख्रिसमससाठी ब्रॅड मुलांना फक्त चारच तास भेटू शकणार

रॅजेलिनाचे ख्रिसमस सेलिब्रिशन हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय असायचे. कारण हे जोडपे सर्व कामे बाजूला सारून मुलांसोबत खास ख्रिसमससाठी वेळ काढत असत. त्यांची मुलेच ख्रिसमस सेलिब्रिशनचे प्लॅनिंग करीत असत. मात्र यावर्षीचे ख्रिसमस सेलिब्रिशन पहिल्यासारखे राहणार नाही. घटस्फोटामुळे विभक्त झालेले हे जोडपे यंदाचे ख्रिसमस कसे सेलिब्रेट करणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. त्यातही बॅ्रड पिट ख्रिसमसच्या पार्टीत मुलांसोबत सहभागी होणार की नाही, अशीही शंका त्याच्या फॅन्सकडून उपस्थित केली जात होती. आता आलेल्या माहितीनुसार पिट मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करणार आहे. मात्र यासाठी त्याला फक्त चारच तासांचा वेळ देण्यात आला आहे. 



ब्रॅड पिट यावेळचे ख्रिसमस कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार याविषयी त्याच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यातच अ‍ॅँजेलिना जोली हिने पिटला मुलांपासून दूर राहण्याचा अगोदर इशारा दिल्याने तो ख्रिसमससाठी तरी मुलांना भेटू शकणार की नाही, असे बोलले जात होते. आता या सर्व चर्चेवर पूर्णविराम देण्यात आला असून, पिट मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रिशन करणार आहे. मात्र यासाठी त्याला केवळ चारच तास वेळ देण्यात आला आहे. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिनानेच पिटला मुलांना भेटू देण्यासाठीची परवानगी दिली आहे. तिच्या मते, जर मी पिटला मुलांपासून जास्त दिवस दूर ठेवले तर मुले मला कधीच माफ करणार नाहीत. 
डेलिस्टार डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुुसार, ब्रॅड पिटपासून दूर गेल्यानंतर अ‍ॅँजेलिनादेखील एकांतात राहणे पसंत करीत आहे. बºयाचवेळा ती रडत असते. त्यामुळेच तिने तिच्या विचारात बदल करीत ब्रॅडला मुलांना भेटण्याची परवानगी दिली असावी. 



दरम्यान, मुलांना भेटायचे म्हणून पिटने खास शॉपिंगही केली असून, त्यामध्ये भरपूर गिफ्टचा समावेश असल्याचे समजते. त्यात अ‍ॅँजेलिनासाठी एखादे गिफ्ट आहे का? असा अंदाज त्याच्या फॅन्सकडून उपस्थित केला जात आहे. 

Web Title: Brad will be able to meet the kids for just four hours for Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.