रॉबशी ब्रेकअप करून ब्लाक चीयना पडली ‘या’ स्टार्सच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 22:51 IST2017-02-26T17:20:19+5:302017-02-26T22:51:55+5:30

मॉडेल ते रिअ‍ॅलिटी स्टार बनलेल्या ब्लाक चीयना हिने अखेर तिचा बॉयफ्रेंड रॉब कर्दाशियां याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. ...

Blake Cheena fell in love with Robsy's 'The Stars' Love | रॉबशी ब्रेकअप करून ब्लाक चीयना पडली ‘या’ स्टार्सच्या प्रेमात

रॉबशी ब्रेकअप करून ब्लाक चीयना पडली ‘या’ स्टार्सच्या प्रेमात

डेल ते रिअ‍ॅलिटी स्टार बनलेल्या ब्लाक चीयना हिने अखेर तिचा बॉयफ्रेंड रॉब कर्दाशियां याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. आता अशी चर्चा पुढे येत आहे की, चीयना रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि रॉबची बहीण कर्टनी कर्दाशियां हिचा एक्स बॉयफ्रेंड क्विंसी कांब्स याच्याशी डेटिंग करीत आहे. 



रॉब कर्दाशियां आणि ब्लाक चीयना
हॉलिवूडलाइफ डॉट काम या वेबसाइटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीयना पुन्हा एकदा प्रेमात पडली असून, तिच्या स्वप्नातील राजकुमार हा क्विंसी आहे. कारण क्विंसी चीयनावर जबरदस्त फिदा असून, तिच्या फिगरविषयी स्तुतीसुमने उधळण्याची एकही संधी तो दवडत नाही. चीयना ही खूपच सेक्सी मॉडेल तथा अभिनेत्री असल्याचे क्विंसी म्हणतो. 

त्याचबरोबर चीयनाला बघून अजिबात विश्वास होत नाही की, ती दोन मुलांची आई आहे, तर चीयना क्विंसीच्या या कौतुकाला प्रेमाचे रूप देत आहे. तिच्या मते क्विंसी माझ्या प्रेमात पडला असून, त्याच्या डोक्यावर सध्या ब्लाक चीयनाचे भूत बसले आहे. त्यामुळेच तो अशाप्रकारचे स्तुतीसुमने उधळत असल्याचे ती म्हणते. 



ब्लाक चीयना आणि क्विंसी कांब्स
या जोडप्याला गेल्या २३ फेब्रुवारी रोजी एंबर रोजबरोबर रात्री फिरताना बघितले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, रॉबसोबतचे तिचे प्रेमसंबंध खूपच वादग्रस्त ठरले आहेत. कारण रॉबच्या कर्दाशियन बहिणींना चीयना पसंत नव्हती. त्यामुळे रॉबने तिच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणावे अशीच त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर तिला ‘कर्दाशियां’ हे नाव देण्यासही त्यांचा विरोध होता. आता चीयना क्विंसीच्या प्रेमात पडली असून, त्यांच्यातील हे संबंध किती काळ टिकतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Blake Cheena fell in love with Robsy's 'The Stars' Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.