२६ वर्षीय सेलेना गोमेज करतेय का ६८ वर्षांच्या बिल मुरेसोबत लग्न? त्या पोस्टमागचे हे आहे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 17:10 IST2019-05-22T17:08:31+5:302019-05-22T17:10:28+5:30
सेलेनाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

२६ वर्षीय सेलेना गोमेज करतेय का ६८ वर्षांच्या बिल मुरेसोबत लग्न? त्या पोस्टमागचे हे आहे रहस्य
हॉलिवूड अभिनेत्री सेलेना गोमेज सध्या तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. कारण या पोस्टद्वारे तिने ती लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ती कोणासोबत लग्न करतेय याविषयी देखील माहिती दिली आहे. पण या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सेलेनाने यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला धडाकेदार एंट्री मारली. या वेळी तिने घातलेल्या कपड्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. साधा आऊटफिट, त्याला साजेशे दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअप या लुकमध्ये सेलेना तिच्या फॅन्सना चांगलीच भावली.
सेलेना गोमेज पहिल्यांदाच कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अवतरल्यामुळे तिच्यासाठी तो दिवस खूपच खास होता. त्यामुळे तिने तिच्या या आऊटफिटमधील फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला. पण त्यासोबतच तिने टाकलेल्या कॅप्शनमुळे चांगलीच चर्चा रंगली. तिच्या या फोटोला ७४ लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत तर तिची पोस्ट वाचून आश्चर्यचकित असलेले तिचे फॅन्स मोठ्या संख्येने या पोस्टवर कमेंट करत आहेत. या पोस्टवर आतापर्यंत ६६ हजाराहून अधिक लोकांनी कमेंट केले आहे.
सेलेनाने फोटोसोबत लिहिले होते की, कान्समध्ये झळकण्याची माझी पहिली वेळ होती. जीम आणि त्याच्या टीमसोबत या चित्रपटाचा भाग होणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी आणि बिल मुरे लग्न करत आहोत.
सेलाना ही केवळ २६ वर्षांची असून बिल हे ६८ वर्षांचे आहेत. त्यामुळेच ही पोस्ट वाचताच तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. हे खरेच लग्न करत आहेत का अशीच चर्चा सगळीकडे सुरू होती. पण तिने ही पोस्ट मस्करीत टाकली आहे. तिने The Dad Don't Lie या तिच्या आगामी चित्रपटासाठी कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तिने याच चित्रपटाच्या निमित्ताने ही पोस्ट टाकली असून तिने तिच्या फॅन्सची चांगलीच फिरकी घेतली आहे.