‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र! फोटो लीक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 19:10 IST2018-10-19T19:10:02+5:302018-10-19T19:10:47+5:30
याचवर्षी रिलीज झालेला अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरनेही अभूतपूर्व यश मिळवत सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले होते. लवकरच अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र! फोटो लीक!!
हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध मार्वल स्टुडिओची बहुचर्चित फिल्म सीरिज ‘अॅव्हेंजर्स’ जगभरातील सिनेप्रेमींची आवडती सीरिज आहे. आत्तापर्यंत आलेल्या या सीरिजच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली. सीरिजचा प्रत्येक चित्रपट त्यामुळे सुपरहिट यादीत जावून बसला. याचवर्षी रिलीज झालेला ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ नेही अभूतपूर्व यश मिळवत सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले होते. लवकरच ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यावेळी अॅव्हेंजर्स सुपरहिरो खलनायक थेनॉसला कशी धूळ चारतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे थेनॉसचा मृत्यू कसा होईल, याबद्दलही वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. तूर्तास सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होतो आहे.
हा फोटो दुसºया कुणाचा नाही तर ‘अॅव्हेंजर्स 4’चा सुपरहिरो आयर्न मॅनच्या शस्त्राचा आहे. मीडियातील चर्चा खरी मानाल तर प्रोटॉन तोफेसारखे दिसणारे हे शस्त्र यापूर्वी ‘मार्वल वि़ कॅपॉम’ या व्हिडिओ गेम सीरिजमध्ये आयर्न मॅनकडे दिसले आहे. त्यामुळे ‘अॅव्हेंजर्स 4’मध्येही थेनॉसला मारण्यासाठी आयर्न मॅन याच शस्त्राचा वापर करेल, असे मानले जात आहे.
‘अॅव्हेंजर्स 4’ पुढीलवर्षी जून वा जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.