हॉलिवूडची ‘ही’ गायिका आहे ए. आर. रेहमानची फॅन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:54 PM2018-08-01T18:54:04+5:302018-08-01T18:54:50+5:30

गुड फॉर यू, सेम ओल्ड लव, बॅक टू यू अशा शानदार गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारी अमेरिकन गायिका सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे. 

american singer selena gomez wants to work with bollywood singer ar rahman | हॉलिवूडची ‘ही’ गायिका आहे ए. आर. रेहमानची फॅन!!

हॉलिवूडची ‘ही’ गायिका आहे ए. आर. रेहमानची फॅन!!

googlenewsNext

गुड फॉर यू, सेम ओल्ड लव, बॅक टू यू अशा शानदार गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारी अमेरिकन गायिका सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.
मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली.
भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते. माझे अनेक सहकारी आणि मॅनेजर संपूर्ण जगभर फिरतात. मी सुद्धा त्यांच्यासोबत फिरते. पण भारतीय संस्कृतीबद्दल माझ्या मनात विशेष आस्था आहे, असे ती म्हणाली.
सेलेना गोमेज सध्या ‘होटल ट्रांसिल्वानिया3-समर व्हॅकेशन’ या हॉलिवूड चित्रपटात व्यस्त आहे. या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला सेलेना आपला आवाज देणार आहे. गायिका असण्यासोबत सेलेना एक अभिनेत्री आणि निर्मातीही आहे. २००७ मध्ये डिज्नी टीव्ही सीरिज विजार्ड आॅफ वेवर्ली प्लेसने तिला प्रचंड लोकप्रीय मिळवूल दिली. यात तिने एलेक्स रूसोची भूमिका साकारली होती.

Web Title: american singer selena gomez wants to work with bollywood singer ar rahman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.