‘या’ अभिनेत्रीला विमानात करायला आवडतो मेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 21:25 IST2017-03-10T15:55:05+5:302017-03-10T21:25:05+5:30

कोणाला काय आवडणार हे सांगणे मुश्कील आहे. आता हेच बघा ना, अमेरिकन अभिनेत्री जेसिका एल्बा हिला विमानात मेकअप करायला ...

'This' actress loves to fly in the plane | ‘या’ अभिनेत्रीला विमानात करायला आवडतो मेकअप

‘या’ अभिनेत्रीला विमानात करायला आवडतो मेकअप

णाला काय आवडणार हे सांगणे मुश्कील आहे. आता हेच बघा ना, अमेरिकन अभिनेत्री जेसिका एल्बा हिला विमानात मेकअप करायला आवडतो; मात्र तिची ही आवड लोकांना वेडेपणा वाटत असल्याचे खुद्द जेसिकानेच सांगितले. 

फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेसिका विमान प्रवासादरम्यान तिच्या सोबतच्या यात्रेकरूंची चिंता न करता मास्क आणि मसाज करण्याची तिची आवड जोपासते. जेसिका अल्बाने ‘द ग्लॉस’ या साप्ताहिकाला माहिती देताना म्हटले की, मी विमान प्रवासादरम्यान मेकअप करीत असते. त्यामुळे माझ्या शेजारी बसलेले प्रवासी मला वेडे समजतात. माझ्या मानसिकतेवर काही परिणाम तर झाला नसेल ना अशी शंका घेतात. 



परंतु मी कधीच याविषयीची चिंता केली नाही. मी लोकांचा फारसा विचार न करता माझी आवड जोपासते. माझा चेहरा खुलत असेल तर मला त्याची काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे मला विमान प्रवासात ब्राउन फेशियल स्पा करायला आवडते. विमान प्रवासादरम्यान हे सर्व साहित्य घेऊन जाण्याची परवानगी असल्याने अन् फेशियलचे साहित्य फारच कमी लागत असल्याने मी नेहमीच विमानात मेकअप करण्याची हौस पूर्ण करते. 

आता जेसिकाची ही आवड तिला जरी योग्य वाटत असली तरी, इतर यात्रेकरू मात्र तिच्या या कृतीमुळे त्रस्त होत असतील यात शंका नाही. पण काहीही असो जेसिकाचा हा अजब छंद आज माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे, हे मात्र नक्की. 

Web Title: 'This' actress loves to fly in the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.