आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली त्याची बायको

By Admin | Updated: February 1, 2017 03:01 IST2017-02-01T03:01:31+5:302017-02-01T03:01:31+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणजे आदर्श शिंदे. आतापर्यंत आदर्शने अनेक मराठी चित्रपटांना आपल्या भारदस्त आवाजाने एक नवीन ओळख करून दिली आहे.

His wife got emotional with this song of Adarsh | आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली त्याची बायको

आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली त्याची बायको

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणजे आदर्श शिंदे. आतापर्यंत आदर्शने अनेक मराठी चित्रपटांना आपल्या भारदस्त आवाजाने एक नवीन ओळख करून दिली आहे. आता पुन्हा एकदा आदर्शने ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटातील एका गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. माझ्या राजा रं... माझ्या शिवबारं... हे आदर्शने गायलेले गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. आदर्शचा आवाज थेट काळजाला भिडणारा असल्याने त्याची प्रत्येक गाणीच सुपरहिट होतात. संगीतकार अमितराज आणि आदर्श शिंदे या दोघांची जोडीदेखील सुपरहिट आहे. आजवर अनेक धडाकेबाज गाणी या जोडीने मराठी चित्रपटांना दिलेली आहेत. परंतु आदर्शने जेव्हा माझ्या शिवबा रं हे गाणे गायले तेव्हा त्याच्या बायकोला ते गाणे ऐकून रडू कोसळले. याविषयी संगीतकार अमितराज सांगतो, आदर्शला नेहमीच एक सवय आहे, तो जेव्हा कोणतंही गाण रेकॉर्ड करतो तेव्हा ते त्याच्या बायकोला ऐकवतो. ‘माझ्या शिवबाला’ गाणं गायल्यानंतर त्याने रात्री घरी जाऊन बायकोला हे गाणं ऐकवलं. त्याच्या बायकोचा मला त्याच रात्री फोन आला आणि ती ढसाढसा फोनवर रडली. ती म्हणाली, ‘अमित तु काय गाण गाऊन घेतलयंस आदर्शकडून.’ बस तिचे ते शब्द आणि रडणंच सर्व काही भावना व्यक्त करत होते. एवढेच नाही तर मला आनंद शिंदे यांनीदेखील फोन करून गाणं छान झाल्याचे सांगितले होते. आता हे गाणे सर्वांनाच आवडत असल्याने या गाण्याला सध्या सगळीकडेच हिट्स मिळत आहेत.

Web Title: His wife got emotional with this song of Adarsh