अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला 'हा' मोठा निर्णय; हात जोडून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:37 IST2025-06-14T16:33:21+5:302025-06-14T16:37:36+5:30

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला मोठा निर्णय; हात जोडून मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली...

hindi television actress hina khan cancel her wedding party amid amedabad plan crash accident  | अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला 'हा' मोठा निर्णय; हात जोडून म्हणाली...

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला 'हा' मोठा निर्णय; हात जोडून म्हणाली...

Hina Khan: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan)मागील काही दिवसांपासून तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. नुकतीच हिना तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नबंधनात अडकली. ४ जूनला तिने साताजन्माची गाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. हिनाची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. दरम्यान, हिना खान चाहत्यांमध्ये एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यासाठी हिना खानने चाहत्यांची  हात जोडून माफीही मागितली.तिच्या या निर्णयाचं सगळ्यांनीच कौतुक केलंय.

अभिनेत्री हिना खान तिच्या अभिनयामुळेच नाहीतर  साधेपणामुळे देखील अनेकांचं लक्ष वेधून घेते. लग्नानंतर तिने मुंबईत एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. पण, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातामुळे तिने पार्टी रद्द केली आहे.अशातच सोशल मीडियावर हिना खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो 'लाफ्टर शेफ्स २' च्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये, हिना खान हात जोडून पापाराझींना म्हणते, "मी तुम्हा सर्वांना लग्नाच्या पार्टीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. आम्हाला वाटलं होतं की आपण एक छोटंस सेलिब्रेशन करू, पण काल ​​जे काही घडलं ते खूप दुःखद आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा परिस्थितीत सेलिब्रेशन करणं योग्य असेल. म्हणून आम्ही ही पार्टची सध्यासाठी पुढे ढकलली आहे. माफ करा... असं म्हणत हिनाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय की, "हिनाबद्दलचा आदर आणखी वाढला आहे." तर आणखी एकाने म्हटलंय, 'देव तुम्हाला आनंदी ठेवो."  अनेकांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. कित्येक निष्पाप नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.अहमदाबाद येथून १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान कोसळले.ज्यामध्ये मृतांचा आकडा २७५ वर पोहोचला आहे. विमान ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर पडले त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Web Title: hindi television actress hina khan cancel her wedding party amid amedabad plan crash accident 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.