राजेंद्र-स्मिताची हटके जोडी

By Admin | Updated: September 15, 2016 02:02 IST2016-09-15T02:02:16+5:302016-09-15T02:02:16+5:30

पप्पी दे पारूला आणि कांताबाई या गाण्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली स्मिता गोंदकर आता एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर यायला सज्ज झालीय.

Highlights of Rajendra-Smita | राजेंद्र-स्मिताची हटके जोडी

राजेंद्र-स्मिताची हटके जोडी

पप्पी दे पारूला आणि कांताबाई या गाण्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली स्मिता गोंदकर आता एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर यायला सज्ज झालीय. आतापर्यंत स्मिताला आपण ग्लॅमरस भूमिकांमध्ये पाहिले आहे. मात्र ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात आपल्याला एक वेगळी स्मिता पाहायला मिळणार आहे. स्मिताबरोबर या चित्रपटात राजेंद्र शिसतकर प्रमुख भूमिका साकारत आहे. राजेंद्रला आतापर्यंत आपण डॅशिंग भूमिकांमध्ये पाहिले होते. आता मात्र तो या चित्रपटात रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटातील राजेंद्रचा लूकही खूप वेगळा आहे. चित्रपटात स्मिताच्या पतीची भूमिका साकारण्यासाठी त्याने १० किलो वजन कमी केले आहे. राजेंद्र्रने यापूर्वी कधीही रोमँटिक भूमिका साकारली नसल्याने स्मितासोबत रोमँटिक दृश्याचे चित्रीकरण करणे त्याला अवघड जात होते. या भूमिकेविषयी तो सांगतो, ‘‘स्मिता गोंदकरसोबत काम करायचे आहे, हे समजल्यावर मला खूपच आनंद झाला होता. आमची जोडी कशी दिसेल, हा प्रश्न सुरुवातीला मला पडला होता; परंतु आमची ही नवरा-बायकोची प्रेमकथा पडद्यावर खूपच छान दिसत आहे. आमची जोडी हटके असली तरी आमची केमिस्ट्री छान जुळून आलीय.’’ स्मिता आणि राजेंद्रचे हे ट्युनिंग पडद्यावर किती कमाल करतेय, हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Web Title: Highlights of Rajendra-Smita