‘पीके’वर सुनावणी होणार

By Admin | Updated: December 20, 2014 03:01 IST2014-12-20T03:01:07+5:302014-12-20T03:01:07+5:30

अभिनेता आमीर खानच्या पीके चित्रपटाचे वादग्रस्त पोस्टर्स व या चित्रपटातील काही दृश्यांविरोधात दाखल झालेल्या दाव्यावर नगर दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

The hearing will be heard on PK | ‘पीके’वर सुनावणी होणार

‘पीके’वर सुनावणी होणार

मुंबई : अभिनेता आमीर खानच्या पीके चित्रपटाचे वादग्रस्त पोस्टर्स व या चित्रपटातील काही दृश्यांविरोधात दाखल झालेल्या दाव्यावर नगर दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चित्रपटाच्या आक्षेपार्ह पोस्टर्सवर व काही दृश्यांवर बंदी आणावी, अशी मागणी करणारा दावा एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केला आहे. यावर सुनावणी होऊ शकते की नाही, असा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. मात्र शुक्रवारी न्यायालयाने यावर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे.

Web Title: The hearing will be heard on PK