"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:04 IST2025-05-12T11:04:15+5:302025-05-12T11:04:38+5:30
Actor Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि सुनीता वेगळे होत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली होती.

"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
अभिनेता गोविंदा (Govinda) गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाने सुनीता आहुजा यांच्याशी लग्न केले आहे. दोघांच्याही लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि सुनीता वेगळे होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. गोविंदाचे एका अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याचे वृत्त आले होते. मात्र, सुनीता यांनी स्वतः या वृत्तांचे खंडन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, त्या आणि गोविंदा कधीही वेगळे होणार नाहीत.
सुनीता आहुजा यांनी टाईम्स नाऊशी बोलताना पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता म्हणाली, ''ज्या दिवशी ते निश्चित होईल. किंवा तुम्ही लोक माझ्या आणि गोविंदाच्या तोंडून ऐकाल. ती वेगळी बाब आहे, पण मला वाटते की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मीही गोविंदाशिवाय राहू शकत नाही. गोविंदा कधीही एका मूर्ख महिलेसाठी त्याचे कुटुंब सोडू शकत नाही.''
''देव माझे घर तोडणार नाही''
पुढे सुनीता म्हणाली, 'अफवा, अफवा, अफवा... आधी सत्य काय आहे ते विचारा. मी हे कधीच स्वीकारणार नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्यांनी मला थेट विचारावे. जर कोणी अफवा पसरवली तर तुम्ही त्याच्याशी सहमत होऊ नका. हे बरोबर नाही. जर असे काही घडले तर मी स्वतः येऊन सर्वांना सांगेन आणि माध्यमांशी बोलेन. पण मला विश्वास आहे की देव माझे घर तोडणार नाही.''
गोविंदा आणि सुनीता आहेत दोन मुलांचे पालक
गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न १९८६ मध्ये झाले होते. त्यांचे लव्हमॅरेज झाले आहे. गोविंदा आणि सुनीता हे दोन मुलांचे पालक आहेत. त्यांना एक मुलगी टीना आणि एक मुलगा यशवर्धन आहुजा आहे. यशवर्धन आहुजा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहे.