त्याने मीडियासमोर प्रियांका चोप्राला दिली सरप्राईज किस

By Admin | Updated: May 15, 2017 14:54 IST2017-05-15T14:03:40+5:302017-05-15T14:54:57+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा "बेवॉच" या चित्रपटाव्दारे हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. "बेवॉच"चा वर्ल्ड प्रिमीयर रविवारी फ्लोरिडा मियामीमध्ये संपन्न झाला.

He gave a surprise to Priyanka Chopra in front of the media | त्याने मीडियासमोर प्रियांका चोप्राला दिली सरप्राईज किस

त्याने मीडियासमोर प्रियांका चोप्राला दिली सरप्राईज किस

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मियामी, दि. 15 - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा "बेवॉच" या चित्रपटाव्दारे हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. "बेवॉच"चा वर्ल्ड प्रिमीयर रविवारी फ्लोरिडा मियामीमध्ये संपन्न झाला. यावेळी ड्वेन  जॉन्सनसह अॅलेक्सांड्रा दादारीयोसह सर्वच कलाकार उत्साहात दिसत होते. प्रिमीयरच्यावेळी प्रियांका तिच्या चाहत्यांना स्वाक्षरी देऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढत असताना तिथे एक वेगळीच घटना घडली.   
प्रियांका मीडियाच्या कॅमे-यांना पोझ देऊन त्यांच्याशी संवाद साधत असताना अचानक ड्वेन जॉन्सन तिथे आला. त्याने प्रियांकाला मागच्या बाजूने पकडले व तिच्या गालांवर चुंबन दिले. प्रियांकासाठी हा एक धक्का होता. प्रियांकानेही ड्वेनच्या या कृतीला हसून दाद दिली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. अमेरिकेत 12 दिवसांनी म्हणजे 25 मे ला तर, भारतात 2 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील प्रियांकच्या रोलच्या लांबीवरुन चर्चा रंगली आहे. 
 
सध्या दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा या दोन भारतीय अभिनेत्रींची हॉलिवूडमध्ये स्पर्धा सुरु आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात दीपिकाचा विन डिझलेबरोबर ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला भारतात म्हणावे तितके यश मिळाले नसले तरी, दीपिका या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. आता चाहत्यांमध्ये प्रियांकच्या रोलची लांबी दीपिकापेक्षा जास्त असणार का ? त्यावरुन चर्चा रंगली आहे. 
 
बेबॉच पाहिल्यानंतरच प्रियांकाने दीपिकावर मात केलीय का? त्याचे उत्तर मिळाले. ‘बेवॉच’चे सध्या प्रमोशन सुरू असून प्रियांका यात हिरिरीने सहभागी झाली आहे. ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेली प्रियांका चोपडा चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये काही सेंकदच बघावयास मिळाल्याने तिच्या चाहत्यांची घोरनिराशा झाली होती. चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यात किमान एक डायलॉग बोलताना प्रियंका दिसली होती.या ट्रेलरमध्ये तिला फारसे समाधानकारक स्थान मिळाले नसले तरी, तिच्या तोंडून ऐकावयास मिळत असलेला डायलॉग तिच्या फॅन्सला नक्कीच सुखावणारा असेल.

Web Title: He gave a surprise to Priyanka Chopra in front of the media