HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:24 AM2024-04-24T11:24:42+5:302024-04-24T11:25:16+5:30

वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

HBD Varun Dhawan : Varun Dhawan net worth is Rs 381 crore : sea-facing flat in Mumbai to collection of luxurious cars | HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ?

HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ?

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वरुण धवनचा जन्म मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी २४  एप्रिल १९८७ रोजी झाला होता.  वरुणने 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. वरुणचे जगात लाखो चाहते आहेत. आपल्या कारकिर्दीत हीट सिनेमे देत वरुणने खूप कमाई देखील केली आहे.  त्याचे नेटवर्थ किती आहे आणि वरुण कोणत्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो हे जाणून घेऊया…

वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वरुण धवन आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये अभिनय करण्यापूर्वी त्याने शाहरुख खानचा 'माय नेम इज खान' या चित्रपटासाठी करण जोहरासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. Moneycontrol.com च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ३८१ कोटींची आहे. चित्रपटांसोबतच वरुणच्या उत्पन्नाचा स्रोत जाहिरातीदेखील आहेत. ज्यासाठी तो २ कोटी रुपये घेतो.  तर वरुणचं मुंबईमधील जुहू येथे २५ कोटींचं घर आहे. त्यामध्येच तो सध्या वास्तव्यास आहे.

याशिवाय वरुण धवनला लक्झरी वाहनांचाही शौक आहे. अभिनेत्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे ८९ लाखांची मर्सिडीज बेंझ ३५०D, मर्सिडीज बेंझ E२२०D आणि ८९ लाखांची ऑडी Q७ आहे. त्याचबरोबर, रॉयल एनफील्ड बुलेट देखील आहे, ज्याची किंमत २.४० लाख रुपये आहे. वरुणच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्यानं बालपणीची मैत्रीण नताशा दलालशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी नताशाचं बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वरुण लवकरच बाबा होणार आहे. 
 

Web Title: HBD Varun Dhawan : Varun Dhawan net worth is Rs 381 crore : sea-facing flat in Mumbai to collection of luxurious cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.