Haq Starcast Fees: इमरान हाश्मीने 'हक'साठी घेतलं १२ कोटींचं मानधन, तर यामीला मिळाले 'इतके' पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:32 IST2025-11-04T16:25:18+5:302025-11-04T16:32:36+5:30
हक सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमासाठी कलाकारांनाही तगडं मानधन मिळालं आहे. जाणून घ्या सविस्तर

Haq Starcast Fees: इमरान हाश्मीने 'हक'साठी घेतलं १२ कोटींचं मानधन, तर यामीला मिळाले 'इतके' पैसे
इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि यामी गौतम (Yami Gautam) यांचा 'हक' (Haq) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. शाह बानो बेगम प्रकरणावर आधारित असलेल्या या कोर्टरूम ड्रामा चित्रपटातील कलाकारांना किती फी मिळाली आहे, याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. जाणून घ्या 'हक' चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलं?
इम्रान आणि यामीने किती मानधन घेतलं?
TV ९ ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'हक' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांना समान मानधन देण्यात आलंय. दोघांनाही या चित्रपटासाठी १२ कोटी रुपयांचं मानधन मिळालं आहे. बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन घेतात, अशी चर्चा असतानाच 'हक'साठी यामी आणि इमरानने घेतलेलं समान समाधान मानधन कौतुकाचा विषय आहे. या चित्रपटात वकीलाची भूमिका साकारणाऱ्या शीबा चढ्ढा यांना सुमारे १ कोटी रुपये फी मिळाली आहे. या चित्रपटातून पदार्पण करणारी वर्तिका सिंग हिची फी लाखोमध्ये आहे.
त्याचबरोबर, चित्रपटात दानिश हुसेन यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे, ज्यासाठी चांगलं मानधन मिळालं आहे. 'जंगली पिक्चर्स' निर्मित हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे ८० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. भारतातील ज्वलंत विषयावर 'हक' चित्रपट आधारीत असून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु कोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला आहे.