Happy Birthday Kajal Aggarwal : काजल इतक्या कोटींची मालकीन, एका वर्षात कमवते इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 12:11 IST2018-06-19T12:10:39+5:302018-06-19T12:11:33+5:30
काजलने 'सिंघम'मध्ये मोठी भूमिका केली होती. त्यानंतर तिला 'स्पेशल 26' आणि 'दो लफ्जो की कहाणी' मध्येही मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या.

Happy Birthday Kajal Aggarwal : काजल इतक्या कोटींची मालकीन, एका वर्षात कमवते इतके कोटी!
मुंबई : साऊथची टॉपची आणि बॉलिवूडमध्ये फारसं यश न मिळालेली अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे चाहते तिला शुभेच्छाही देत आहेत. अशात तिच्याबाबत वेगवेगळ्या गोष्टींचीही चर्चा होत आहेत.
काजलने 'सिंघम'मध्ये मोठी भूमिका केली होती. त्यानंतर तिला 'स्पेशल 26' आणि 'दो लफ्जो की कहाणी' मध्येही मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या. पण फारसं यश तिला मिळालं नाही. पण साऊथमध्ये मात्र तिचं चांगलंच नाव आहे आणि त्यामुळेच ती चांगली कमाईही करीत आहे.
काजलला बॉलिवूडमध्ये अजय देवगणसोबत मोठी संधी मिळाली पण तिचं नशीब फार काही चमकलं नाही. सिंघमनंतर दुसरा हिंदी सिनेमा मिळायला तिला फार वेळ गेला. पण टॉलिवूडमध्ये तिचं नशीब फारच जोरावर आहे.
काजलच्या संपत्तीबाबत सध्या जोरदार चर्चा होत आहे. काजलची लाइफस्टाईलही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. काजलला कार्सची फार आवड आहे. तिच्याकडे मिनी कूपर, ऑडीसारख्या 3 लक्झरी कार्स आहेत. या गाड्यांची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, काजल सध्या 66 कोटी रुपयाच्या संपत्ती मालकीन आहे. त्यात काजलच्या बंगल्याची किंमत 7 कोटी रुपये आहे. काजल सिनेमातून कमाई करण्यासोबतच काही बिझनेसमधूनही पैसे कमावते.
काजल ही वर्षाला 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. सिनेमात येण्याआधी काजलने काही जाहीरातींमध्येही काम केलं होतं. त्यातूनही तिने चांगली कमाई केली आहे.