गुलाबाच्या कळीची बुलेट ट्रेन सुसाट

By Admin | Updated: February 20, 2016 01:20 IST2016-02-20T01:20:32+5:302016-02-20T01:20:32+5:30

कलाकार हा बॉलीवूडचा असो वा मराठी इंडस्ट्रीचा; प्रत्येक कलाकारासाठी प्रेक्षकांचे प्रेम हे खूप महत्त्वाचे असते. पण हे प्रेम कळणार कसे? तर यासाठी सोशल वेबसाइट हा उत्तम पर्याय आहे.

Gulab's wooden bullet train is comfortable | गुलाबाच्या कळीची बुलेट ट्रेन सुसाट

गुलाबाच्या कळीची बुलेट ट्रेन सुसाट

कलाकार हा बॉलीवूडचा असो वा मराठी इंडस्ट्रीचा; प्रत्येक कलाकारासाठी प्रेक्षकांचे प्रेम हे खूप महत्त्वाचे असते. पण हे प्रेम कळणार कसे? तर यासाठी सोशल वेबसाइट हा उत्तम पर्याय आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रॉम अशा विविध सोशल वेबसाइट्सच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराला आपल्या प्रसिद्धीचा अंदाजदेखील येतो. असाच एक अंदाज तेजस्विनी पंडितला चक्क इन्स्टाग्रामवर आला आहे. चक्क तिला खूप कमी कालावधीत ५० हजार जणांनी फॉलो केले आहे. या बाबतीत तिने या सोशल वेबसाइटवर प्रेक्षकांचे आभारदेखील मानले आहेत. तसेच ५० हजार हा आकडा पाहून आपण खूप आनंदी झाल्याचे ती सांगते. चला तर या गुलाबाच्या कळीची बुलेट ट्रेन अशीच सुसाट निघो, यासाठी शुभेच्छा देऊ या.

 

Web Title: Gulab's wooden bullet train is comfortable