गुलाबाची कळी मँगोची जबरा फॅन

By Admin | Updated: April 15, 2016 01:41 IST2016-04-15T01:41:43+5:302016-04-15T01:41:43+5:30

उन्हाळा सुरू झाला, की प्रत्येकाला ओढ लागते ती आंब्याची. कधी एकदाचे घरी आंबे आणतात आणि ते आनंदाने मनसोक्त खाऊ, अशी प्रत्येकाची इच्छादेखील असते. मग, या आशा मँगो

Gulabache ki mango ki jadra fan | गुलाबाची कळी मँगोची जबरा फॅन

गुलाबाची कळी मँगोची जबरा फॅन

उन्हाळा सुरू झाला, की प्रत्येकाला ओढ लागते ती आंब्याची. कधी एकदाचे घरी आंबे आणतात आणि ते आनंदाने मनसोक्त खाऊ, अशी प्रत्येकाची इच्छादेखील असते. मग, या आशा मँगो सीझनमध्ये मराठी सेलीब्रिटी तरी कसे मागे राहतील? अशीच एक मँगोची जबरा फॅन असलेली सर्वांची आवडती गुलाबाची कळी म्हणजेच तेजस्विनी पंडित. लोकमत सीएनएक्सशी बोलताना ती म्हणाली, ‘‘मी आंब्याची भयंकर फॅन आहे. हा फ्रूटच असा आहे, की खूप रेअर मिळतो. तसेच वर्षातून एकदाच खायला मिळतो. त्यामुळे मी या महिन्यात भरपूर आंबे खाते. वजनाचा विचारदेखील करीत नाही आणि हीटमुळे चेहरा खराब होईल, याची भीतीदेखील नसते. कारण चेहरा परत ठीक होईल; पण आंबा खायला मिळणार नाही आणि आंबे म्हटल्यावर ते फ्रेश असतात की नाही, याबाबतदेखील शंकाच असते. पण, मला अशी कोणतीही भीती नसते. कारण दरवर्षी मला आंबे माझा विघ्नेशदादा आठवणीने फोन करून देतो. हे आंबे त्याच्याच देवगड येथील शेतातील असल्यामुळे कोणताही विचार न करता मीदेखील हे आंबे घरातीलच असल्यामुळे बिनधास्तपणे खाते. आय लव्ह मँगो...’’ असो. या सुंदर तेजस्विनीला भरपूर आंबे खायला मिळोत.

Web Title: Gulabache ki mango ki jadra fan