'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:21 IST2025-11-26T11:20:33+5:302025-11-26T11:21:53+5:30
गिरीजा ओकने सांगितली कशी होती कुटुंबियांची प्रतिक्रिया?

'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आज 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या लूकवर, तिच्या दिसण्यावर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. हा प्रतिसाद पाहून गिरीजा भारावून गेली आहे. पण यासोबतच तिला विचित्र कमेंट्स, मेसेजचाही सामना करावा लागत आहे. याबद्दल तिने सविस्तर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रियाही दिली होती. आता ती नुकतंच पुन्हा त्यावर बोलली आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा ओख म्हणाली, "हे इतकं व्हायरल होईल याचा मलाही अंदाज नव्हता. मला बरेच मेसेज आले. काहींना मला माझे रेटही विचारले. एका तासासाठी किती घेणार असे घाणेरडे मेसेज आले. मी सगळेच मेसेज वाचू शकले नाही. पण एखादा दिसतो...हे लोक कधी माझ्यासमोर आले तर ते डोळे वर करुन बघणारही नाहीत. हे एका पडद्यामागून बोलतात, त्यांना मजा येते, थ्रिल वाटतं. हेच समोर आले तर बोलूही शकत नाहीत. मान खाली घालून आदरपूर्वकच बोलतात. हा जरा विचित्रच झोन आहे की तुम्ही पडद्यामागून काहीही बोलू शकतात आणि समोर आलं की तचुमची हिंमतही होत नाही. या व्हर्च्युअल स्पेसला किती गांभीर्याने घ्यायचं यावर मोठी चर्चा होऊ शकते."
ती पुढे म्हणाली, "एकाने मला will you be my babes ma'am? असाही प्रश्न विचारला. यामध्ये ते मला बेब्स म्हणत आहेत आणि सोबत मॅम म्हणत आदरही देत आहेत. त्यामुळे हे सगळं फारच इंटरेस्टिंग झालं आहे. माझं संपूर्ण कुटुंब याच इंडस्ट्रीतलं आहे त्यामुळे अशाप्रकारचे कमेंट्स येणं, क्लिकबेट बातम्या येणं या सगळ्याकडे बघण्याचा आमच्या कुटुंबियांचा बॅलन्स दृष्टिकोन आहे."
गिरीजा ओक मराठी थिएटर आर्टिस्ट आहे. सध्या तिचं 'ठकीशी संवाद' हे नाटक सुरु आहे. तसंच ती 'परफेक्ट फॅमिली' सिनेमातही दिसणार आहे. गिरीजाने 'तारे जमीन पर','शोर इन द सिटी','जवान' या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.