म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:21 IST2021-10-26T17:16:33+5:302021-10-26T17:21:54+5:30
नुकतेच सलमान खानचा जावई आयुष शर्माचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयुषच्या वाढदिवशी सलमानच्या घरी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री जेनेलिया डिसूझाचा.आपल्या हटके स्टाईलसाठी जेनिलिया प्रसिद्ध आहे. जेनिलियाच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त सिनेमातच नाहीतर बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्समध्येही पाहायला मिळतो.
नुकतेच सलमान खानचा जावई आयुष शर्माचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयुषच्या वाढदिवशी सलमानच्या घरी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलिवूड कलाकारांनाही आमंत्रण देण्यात आले होते. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हे दोघेही या पार्टीत सहभागी झाले होते. खास या पार्टीसाठी जेनिलायाने खास डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
या ड्रेसमध्ये जेनिलाय कमालीची सुंदर स्टायलिश दिसत होती. पण याच ड्रेसमुळे जेनिलायावर नेटीझन्सने निशाणा साधला आहे. जेनिलियाचा इतका शॉर्ट ड्रेसमधला लूक तिच्या चाहत्यांना अजिबात रुचलेला दिसत नाही. एकीकडे चाहत्यांची वाहवा मिळवणारी जेनिलिया यावेळी मात्र ड्रेसिंगमुळेच ट्रोल होत आहे. तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
दुसरीकडे याच ड्रेसमुळे जेनिलियाला अवघडल्यासारखेही वाटत असल्याचे स्पष्ट दिसतंय.गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफर्सला पोज देताना ती अजिबात कंम्फर्टेबल नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हा ड्रेस तिच्यासाठी चांगलाच डोकेदुखी ठरत असल्याचे तुम्हालाही जाणवेल. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत नापसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.