पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:16 PM2023-06-14T14:16:10+5:302023-06-14T14:17:13+5:30

Gautami Patil Mother Video Viral: काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने आईसोबतचा एक फोटो शेयर केला होता. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

gautami patil mother video viral gautami patil chi aai on camera for first time | पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

Gautami Patil Mother Video: सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते.  गौतमी पाटील जिथे जाईल तिथे गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले असले तरी, दिवसेंदिवस तिची क्रेझ वाढत चालेली दिसत आहे. राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. अलीकडेच गौतमी पाटील हिचे वडील सर्वांसमोर आले होते. यानंतर आता गौतमी पाटीलच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिने आपल्या आईसोबतचा एक फोटो शेयर केला होता. गौतमी अगदीच लहान असतानाचा हा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केला होता. त्याला काही दिवस उलटले असतानाच आता गौतमीच्या आईचा व्हिडिओ समोर आला आहे. गौतमीची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर आली आहे. एका सोशल मीडिया चॅनेलने तिच्या आईचा व्हिडिओ शेयर केला आहे. 

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई

या व्हिडिओमध्ये गौतमी आपल्या आईला कडकडून मिठी मारते. या निमित्ताने पहिल्यांदाच सर्वांना गौतमीची आई पाहायला मिळाली. त्यामुळे हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. उंबराच्या झाडाला दत्ताची सावली अन् गौतमीला जन्म देणारी धन्य ती माऊली, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, अलीकडेच गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. 

दरम्यान, आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसे काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.

 

Web Title: gautami patil mother video viral gautami patil chi aai on camera for first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.