गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:04 PM2024-05-15T17:04:38+5:302024-05-15T17:06:08+5:30

गौरव मोरेने मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोच्या मंचावर मल्लिका शेरावतसमोर कॉमेडीची उधण (Madness Machayenge , gaurav more, mallika sherawat)

Gaurav More doing funny act infront of Mallika Sherawat video viral Madness Machayenge | गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

गौरव मोरे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकार. गौरवला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. गौरवने गेल्या काही वर्षात सिनेमा आणि रिअॅलिटी शोमधून स्वतःची छाप पाडलीय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचा गौरव हुकमी एक्का. गौरवने या शोमध्ये वनिता खरात - ओंकार भोजनेसोबत धमाल केली. गौरवने काही दिवसांपुर्वी  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडला. आता गौरव 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये झळकतोय. या शोच्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आली होती. तेव्हा गौरवने मॅडनेसचा अक्षरशः कहर केलेला दिसला.

'मॅडनेस मचाएंगे' च्या नवीन एपिसोडमध्ये पाहायला मिळतं की, मल्लिका शेरावत शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून आलेली दिसतेय. त्यावेळी गौरव मोरे मल्लिकासोबत तिचं गाजलेलं 'माया माया' या गाण्यावर परफॉर्म करताना दिसतोय. गौरव एकेक करुन त्याचं शर्ट काढतो आणि फक्त बॉडीवर धमाल नाचताना दिसतोय. गौरव स्वतःवर पाणी ओततो. मल्लिकाही एक तांब्या पाणी त्याच्यावर टाकते. 

अशाप्रकारे गौरवने मल्लिकासमोर मॅड परफॉर्मन्स केलेला दिसला. मल्लिकाही हा परफॉर्मन्स पाहून गौरववर फिदा झाली. ती गौरवला म्हणाली, "मी आजवर माया माया गाण्याचे इतके वर्जन बघितले आहेत. पण तू केलेलं कमाल आहे. तुम्ही सर्व विश्वास ठेवण्याच्या पलाकडे आहेत." अशा शब्दात मल्लिकाने गौरवचं कोतुक केलं. अशाप्रकारे गौरवने 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये त्याच्या कॉमेडीने सर्वांनाच मोहित केलेलं दिसलं.

 

Web Title: Gaurav More doing funny act infront of Mallika Sherawat video viral Madness Machayenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.