गौहर म्हणते,‘मी यशस्वी कलाकार’

By Admin | Updated: August 4, 2016 02:01 IST2016-08-04T02:01:31+5:302016-08-04T02:01:31+5:30

मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान ही ‘फिव्हर’ या चित्रपटामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.

Gauhar says, 'I am a successful artist' | गौहर म्हणते,‘मी यशस्वी कलाकार’

गौहर म्हणते,‘मी यशस्वी कलाकार’


मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान ही ‘फिव्हर’ या चित्रपटामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राजीव खंडेलवाल याच्यासोबत चित्रपटात केलेल्या किसिंग सीन्समुळे तिच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसते आहे. ती म्हणते, ‘मी एक यशस्वी कलाकार आहे. मी चांगले चित्रपट आतापर्यंत केले आहेत. पण मुख्य भूमिकेत एखाद्या हीरोइनकडून जे अपेक्षित असते ते मी करते. मला वाटतेय की, माझा चांगला काळ आता सुरू झालाय.’ माझे दिग्दर्शक राजीव झव्हेरी म्हणाले, गौहर-राजीव हे माझे हीरो आहेत. त्यांनी माझ्या भूमिकेला विशेष महत्त्व दिले. मी यात काव्या चौधरीची भूमिका केली आहे.

Web Title: Gauhar says, 'I am a successful artist'