असा बनला गौहर खानच्या लग्नातील लेहंगा, झलक पाहायला विसरू नका...

By गीतांजली | Updated: December 25, 2020 13:43 IST2020-12-25T13:36:14+5:302020-12-25T13:43:03+5:30

गौहरच्या लग्नाच्या लेहंगाची पहिली झलक समोर आली आहे.

Gauahar khan gives a glimpse of her bridal lehenga ahead of nikah with zaid darbar | असा बनला गौहर खानच्या लग्नातील लेहंगा, झलक पाहायला विसरू नका...

असा बनला गौहर खानच्या लग्नातील लेहंगा, झलक पाहायला विसरू नका...

शुक्रवार  25 डिसेंबर (आज) हा खास दिवस आहे. त्याला कारणही तसेच आहे गौहर खान आणि जैद दरबार आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांची गुरुवारी (काल) मेहेंदी सेरेमनी पार पडली. गौहर आणि जैदच्या निकाहची तयारी पूर्ण झाली आहे. गौहरच्या लग्नाच्या लेहंगाची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  

गौहर खानने स्वत: त्याचं  लेहंग्याची एक झलक दाखविली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. गौहर लिहिते, 'आता थांबू शकत नाही.'  गौहरच्या लेहंगा बनवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गौहरने लग्नासाठी पेस्टल शेड रंगाच्या लेहंगाची निवड केली आहे.


गौहरच्या मेहंदी सेरेमनी मोठ्या धुमधडक्यात झाली. सोशल मीडियावर यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मेहंदी सेरेमनीत गौहरचे सासरे इस्माईल दरबार यांनी 'तडाप तडाप' या गाण्यावर परफॉर्म  केले.

काल गुरुवारी मेहंदी सेरेमनीच्या आधी गौहरने फोटोग्राफरना सांगितले की लग्नानंतर सगळ्यांनी घरी नक्की या. आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत गौहर खानने सांगितले की आईने आपल्यासाठी मिठाई तयार करणार आहे.

जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे.सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे. तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता.
 

Web Title: Gauahar khan gives a glimpse of her bridal lehenga ahead of nikah with zaid darbar