हंसिकाच्या नावाने होतेय फसवणूक

By Admin | Updated: August 9, 2014 23:44 IST2014-08-09T23:44:17+5:302014-08-09T23:44:17+5:30

दक्षिण भारतीय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या नावाने एक तोतया मॅनेजर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना फसवत असल्याचे समोर आले आहे.

Fraud caused by the name of a clown | हंसिकाच्या नावाने होतेय फसवणूक

हंसिकाच्या नावाने होतेय फसवणूक

>दक्षिण भारतीय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या नावाने एक तोतया मॅनेजर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना फसवत असल्याचे समोर आले आहे. यावर हंसिकाने स्पष्ट केले आहे की, तिचे करिअर तिची आई मोना मॅनेज करीत असून तिने कोणताही पर्सनल मॅनेजर ठेवलेला नाही. नुकतेच एका तोतया पर्सनल मॅनेजरने निर्मात्यांशी संपर्क करून हंसिकाच्या नावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर हंसिका म्हणाली की, ‘मी फिल्म इंडस्ट्रीतील माङया मित्रंना सांगू इच्छिते की, एक व्यक्ती माङया नावाचा गैरवापर करीत आहे. ती व्यक्ती माङो मॅनेजर असल्याचे सांगत नवे प्रोजेक्टस् आणि फायनांसबाबत बोलत असल्याचे मला समजले आहे; पण मला तुम्हाला सांगावेसे वाटते की, ‘या कामी माझी आई मोना मला मार्गदर्शन करीत असते. स्वत:च्या जबाबदारीवर या तोतया मॅनेजरशी व्यवहार करावा.’ हंसिकाचे दोन तामीळ आणि एक तेलुगू चित्रपट येत्या काळात रिलीज होणार आहेत.

Web Title: Fraud caused by the name of a clown