'मोहेंजदडो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !

By Admin | Updated: June 8, 2016 12:26 IST2016-06-08T11:29:41+5:302016-06-08T12:26:21+5:30

अभिनेता ह्रतिक रोशनच्या आगामी चित्रपट 'मोहेंजदडो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे

First look out of 'Mohenjodo' movie! | 'मोहेंजदडो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !

'मोहेंजदडो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 08 - अभिनेता ह्रतिक रोशनच्या आगामी चित्रपट 'मोहेंजदडो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. ह्रतिक रोशनच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाद्वारे पूजा हेगडेदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. पूजाने २००९ साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.
 
ह्रतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून हा पोस्टर शेअर केला आहे. कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्या वादामुळे हृतिकच्या या चित्रपटाला फारच उशीर होत गेला. त्याचबरोबर रोशन कुटुंबियांचा होम प्रोडक्शन ‘काबील’ चित्रपटामुळे देखील या चित्रपटाचे शूटिंग खुप लांबले. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आला होता.
 
चित्रपटाचं शूटिंग भूज आणि मुंबईत करण्यात आलेलं आहे. जबलपूर आणि ठाण्यातही काही काळ चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटासोबत 'मोहेंजदडो’ हा चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे. 
 

Web Title: First look out of 'Mohenjodo' movie!