महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात गौरवची वर्णी

By Admin | Updated: October 20, 2016 02:18 IST2016-10-20T02:18:02+5:302016-10-20T02:18:02+5:30

‘तुझविन सख्या रे’ या मालिकेतील अभिनेता गौरव घाटणेकर लवकरच मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे.

In the film of Mahesh Manjrekar, | महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात गौरवची वर्णी

महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात गौरवची वर्णी


‘तुझविन सख्या रे’ या मालिकेतील अभिनेता गौरव घाटणेकर लवकरच मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे. 'वाडा' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सला गौरव सांगतो, महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. खूप आनंद होतो आहे. त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ही खूप मोठी संधी मिळाल्याने करिअरला चार चाँद लागल्यासारखेच आहे. चित्रपटात सुनील बर्वे, आनंद इंगळे, शशांक केतकर, नेहा महाजन असे अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असल्याचे तो म्हणाला.

Web Title: In the film of Mahesh Manjrekar,