शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:57 IST2026-01-03T10:57:11+5:302026-01-03T10:57:41+5:30
फराह तिच्या युट्यूब चॅनेलमधून सेलिब्रिटींच्या घरांची सफर चाहत्यांना दाखवत असते. आता ती केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे. फराहने तिचा कुक दिलीपसह नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराची सफर केली.

शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
फराह खान ही बॉलिवूडमधली लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. फराह तिच्या युट्यूब चॅनेलमधून सेलिब्रिटींच्या घरांची सफर चाहत्यांना दाखवत असते. आता ती केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे. फराहने तिचा कुक दिलीपसह नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराची सफर केली. व्हिडीओतून तिने नितीन गडकरींच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
व्हिडीओमध्ये नितीन गडकरी त्यांच्या घरातील कॉन्फरन्समध्ये फराहला घेऊन जातात. या कॉन्फरन्स रुममधील काही भिंती या शेणाने रंगवल्या आहेत. शेणापासून तयार करण्यात आलेला रंग या कॉन्फरन्स रुममधील काही भिंतींना देण्यात आल्याचं नितीन गडकरी सांगताना दिसत आहेत. ते पाहून फराह खानही थक्क झाली. कारण तो रंगही इतर भिंतीच्या रंगासारखाच दिसत आहे. फराह आणि दिलीपने नितीन गडकरींसोबत मजेशीर गप्पाही मारल्या.
नितीन गडकरींच्या घरी गेल्यानंतर फराहचा कुक दिलीपने केंद्रीय मंत्र्यांना त्याच्या गावात रस्ता बनवण्याची मागणी केली. "माझं गाव दरभंगा येथे एक चांगला रस्ता बनवून द्या", असं कुक दिलीप गडकरींना म्हणाली. दिलीपची मागणी ऐकताच फारह खानने डोक्याला हात मारला. ती म्हणाली, "अरे सर एवढे मोठे एक्सप्रेस वे, फ्लायओव्हर बनवतात". ते ऐकून नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही.