'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज

By तेजल गावडे. | Updated: April 21, 2025 12:12 IST2025-04-21T12:09:55+5:302025-04-21T12:12:31+5:30

Rajeshwari Kharat Religion: 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर धर्म बदलल्याचे सांगितले आहे.

'Fandry' Movie Fame Shalu Aka Rajeshwari Kharat converted to Christianity, fans are upset after her changes religion | 'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज

'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'फॅण्ड्री' (Fandry Movie) चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat)ला खूप लोकप्रियता मिळाली. आजही लोक तिला जब्याची शालू म्हणून ओळखतात. सिनेमानंतरही राजेश्वरी ग्लॅमरस फोटोंमुळे आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, बाप्तिस्मा स्वीकारलं. याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे. हा फोटोतून स्पष्ट होतंय की, तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र तिची ही पोस्ट पाहून चाहते नाराज झाले आहेत.


चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
राजेश्वरीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, ख्रिश्चिन धर्मापेक्षा ही प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धम्म असताना दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? बाबासाहेबांनी तब्बल २५ वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धम्म दिला तो असेच नव्हे..! तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे जे स्वाभिमानी असतात. दुसऱ्या एकाने लिहिले की, काळी चिमणी घालवली लगा..... बऱ्याच लोकांनी अनफॉलो अशी कमेंट केली आहे. 

Web Title: 'Fandry' Movie Fame Shalu Aka Rajeshwari Kharat converted to Christianity, fans are upset after her changes religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.