प्रसिद्ध गायिका शान जॉन्सनचा चेन्नईत मृत्यू

By Admin | Updated: February 6, 2016 11:38 IST2016-02-06T11:34:44+5:302016-02-06T11:38:02+5:30

प्रसिद्ध गायिका व संगीतकार शान जॉन्सन (वय २९) यांचा चेन्नईतील घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Famous singer Shane Johnson dies in Chennai | प्रसिद्ध गायिका शान जॉन्सनचा चेन्नईत मृत्यू

प्रसिद्ध गायिका शान जॉन्सनचा चेन्नईत मृत्यू

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ६ - प्रसिद्ध गायिका व संगीतकार शान जॉन्सन (वय २९) यांचा त्यांच्या चेन्नईतील घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दिवंगत संगीतकार जॉन्सन हे त्यांचे वडील होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील अशोकनगर भागात राहत असलेल्या शान जॉन्सन यांचा काल (शुक्रवार) त्यांच्या घरातच मृतावस्थेत आढळल्या. त्यांची आई व मित्र त्यांच्या घरी पोहोचले असता घराचा दरवाजा कोणीही उघडला नाही, तसेच कोणी फोनही उचलला नाही. अखेर ब-याच प्रयत्नांनतर दरवाजा तोडण्यात आला असता शान यांचा मृतदेह आढळला. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Famous singer Shane Johnson dies in Chennai