Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीला सोडावी लागली मालिका, मोठं कारण आलं समोर

By तेजल गावडे | Updated: April 28, 2022 12:53 IST2022-04-28T11:20:29+5:302022-04-28T12:53:02+5:30

'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाची मैत्रिणी अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली भोसले हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

Exclusive: Due to this reason, Ashwini aka Vaishali Rahul Bhosale left the series in 'Rang Mazha Vegla', a big reason came to the fore | Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीला सोडावी लागली मालिका, मोठं कारण आलं समोर

Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीला सोडावी लागली मालिका, मोठं कारण आलं समोर

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने आणि त्यातील पात्रांनी कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची मैत्रीण अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र अचानक तिला ही मालिका सोडावी लागली. या मागचे कारण समोर आले आहे. खुद्द वैशाली भोसलेने लोकमतशी बोलताना सांगितले की, मालिकेत काम करत असताना ती प्रेग्नेंट राहिली आणि तिला ही मालिका सोडावी लागली. तसेच काही महिन्यानंतर तिचे मिसकॅरेज झाल्याचेही तिने सांगितले.

वैशाली भोसलेने सांगितले की, रंग माझा वेगळामध्ये मी अश्विनी नावाचे छान पात्र साकारत होते. पण अचानक प्रेग्नेंट राहिले आणि मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली. त्यामुळे मला ही मालिका सोडावी लागली. जवळपास दोन-तीन महिने बेड रेस्ट घेतली. पण माझे मिसकॅरेज झाले. त्यानंतर मला कोणतेच काम करता आले नाही.

रंग माझा वेगळा या मालिकेनंतर आता वैशाली भोसलेने झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत काम केले आहे. यात तिने छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याबद्दल ती म्हणाली की, मन झालं बाजिंद मालिकेचा निर्माता तेजपाल वाघ माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला मी रंग माझा वेगळा मालिका सोडली आणि माझे मिसकॅरेज झाले हे माहित होते. त्यामुळे तो मला म्हणाला की सध्या मोकळी आहेस आणि जरा तुला चेंज म्हणून मालिकेत काम करतेस का, तुला बरे वाटेल.  मलादेखील त्याचे म्हणणे पटले. तसेच मालिकेचा दिग्दर्शक अनिकेत साने हादेखील माझा कॉलेजचा मित्र आहे. त्यामुळे तेजपाल, अनिकेत यांच्यासोबत एकत्र काम करायला मज्जा येईल, या उद्देशाने मी या मालिकेत काम करण्यासाठी होकार दिला.


मन झालंं बाजिंद या मालिकेत वैशालीने अपूर्वाची भूमिका साकारली आहे. ती एका एनजीओची संचालिका असून तिने एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. पात्र छोटेसे असले तरी ते महत्त्वाचे आहे. माझे मार्गदर्शक रमेश मोरे सर नेहमी सांगतात की कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते. काम काम असतं. तर त्यांचे म्हणणे देखील माझ्या लक्षात होते. त्यामुळे माझी छोटीशी भूमिका असली तरी काम करायला खूप मजा आली, असे वैशालीने सांगितले.

मालिकेच्या अनुभवाबद्दल वैशालीने सांगितले की, सेटवर खूपच छान वातावरण आहे. मालिकेतील रंजना, फुई आजी, क्रिष्णा, राया, गुली मावशी आणि भाऊसाहेब या सगळ्यांनी लगेचच मला आपलेसे केले. रंजना आणि फुई आजीसोबत तर माझी चांगलीच गट्टी जमली. त्यामुळे हा अनुभव खूपच छान होता.

Web Title: Exclusive: Due to this reason, Ashwini aka Vaishali Rahul Bhosale left the series in 'Rang Mazha Vegla', a big reason came to the fore