‘चित्रपटांचा आनंद घेणे ही एक कला’, थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:49 IST2025-01-17T10:42:31+5:302025-01-17T10:49:41+5:30

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीचा कार्याध्यक्ष या नात्याने याचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा सल्ला दिल्याचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

'Enjoying films is an art', Third Eye Asian Film Festival concludes | ‘चित्रपटांचा आनंद घेणे ही एक कला’, थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता

‘चित्रपटांचा आनंद घेणे ही एक कला’, थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता

मुंबई : चित्रपटांचा आनंद घेणे हे देखील एक विज्ञान आहे. केवळ तीन तास चित्रपट पाहिला म्हणजे त्याचा आनंद घेतला असे होत नाही. चित्रपट एन्जॅाय करण्याची एक पद्धत आहे, त्याचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्येही व्हायला हवा. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीचा कार्याध्यक्ष या नात्याने याचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा सल्ला दिल्याचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा अंधेरीतील मुव्हीमॅक्स सिनेमागृहात पार पडला. यावेळी विनय सहस्रबुद्धे, महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, व्यवस्थापकीय संचालक संदीप मांजरेकर, संचालक डॉ. संतोष पाठारे, ज्युरी मेंबर मंजुळ बरुआ आदी उपस्थित होते. यावेळी लेखक अनिल झडकर यांना सुधीर नांदगावकर मेमोरिअल अवॉर्ड, तर फिल्म सोसायटी ॲक्टिव्हीस्ट रफिक बगदादी यांना सत्यजित रे अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 

‘जिप्सी’ने मारली बाजी

२१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवामध्ये रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडले. सुमारे ६० चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. यंदाच्या महोत्सवात ‘जिप्सी’ चित्रपटाने बाजी मारली. याच चित्रपटासाठी शशी खंदारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता मंगेश आरोटे यांनी ‘जिप्सी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
 श्रद्धा खानोलकर हिला ‘भेरा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘छबिला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल भालेराव आणि ‘सिनेमॅन’ या चित्रपटासाठी अभिनेता पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: 'Enjoying films is an art', Third Eye Asian Film Festival concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा