महेश भट्टसोबत काम करण्यास उत्सुक

By Admin | Updated: July 2, 2014 09:09 IST2014-07-02T09:00:22+5:302014-07-02T09:09:45+5:30

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. महेश भट्ट यांच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटात विद्या मुख्य भूमिकेत आहे.

Eager to work with Mahesh Bhatt | महेश भट्टसोबत काम करण्यास उत्सुक

महेश भट्टसोबत काम करण्यास उत्सुक

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. महेश भट्ट यांच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटात विद्या मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार असून यात इमरान हाश्मी आणि राजकुमार राव विद्यासोबत मुख्य भूमिकेत दिसतील. चित्रपटाची स्क्रिप्ट महेश भट्ट लिहीत असून, हा चित्रपट त्यांच्या खासगी जीवनावर आधारित असेल. याबाबत बोलताना विद्या म्हणाली, ‘हमारी अधुरी कहानी’मध्ये महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्याबाबत मी खुप उत्सुक आहे. बॉबी जासूसनंतर सप्टेंबरमध्ये आम्ही चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहोत. मी महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्याबाबत खूपच रोमांचित आहे. आम्ही लवकरच शूट सुरू करतोय. चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओज आणि महेश भट्ट यांची विशेष फिल्म ही प्रोडक्शन कंपनी करीत आहे.

Web Title: Eager to work with Mahesh Bhatt