म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाला लगावली थप्पड

By Admin | Updated: December 12, 2014 12:13 IST2014-12-12T12:09:45+5:302014-12-12T12:13:50+5:30

कास्टिंग काऊचचा आरोप करत चित्रपटाच्या म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाला मीडियासमोरच थप्पड लगावल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

During the music launch, the actress directed the director to slap | म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाला लगावली थप्पड

म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाला लगावली थप्पड

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - एका चित्रपटाच्या म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाला मीडियासमोरच थप्पड लगावल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 'मुंबई कॅन डान्स साला' या चित्रपटाच्या म्युझिक लाँचदरम्यान अभिनेत्री राखी सावंतची मैत्रिण अभिनेत्री मनिषा कुमारीने दिग्दर्शक सचिंद्र शर्मा याच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप लावत त्याला सर्वासमोर थोबाडीत लगावली.
गुरूवारी या चित्रपटाचे म्युझिक लाँच होते. त्यासाठी निर्माते दिग्दर्शकासह चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. तेवढ्यात एक तरूणी स्टेजवर आली व तिने दिग्दर्शकाशी हुज्जत घालत त्याला थोबाडीत मारली. तसेच धक्काबुक्कीही केली. अभिनेत्री राखी सावंतनेही तिला सपोर्ट केला. सिनेमात काम देण्यासाठी सचिंद्रने आपल्याला कॉम्प्रोमाईज करण्यास सांगितले, असे सांगत त्या अभिनेत्रीने दिग्दर्शकावर कास्टिंग काऊचचा आरोप लावला. तसेच पोलिसांत तक्रारही दाखल केली.
मात्र माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून पब्लिसिटीसाठी मनिषाने हे सर्व केल्याचा असा दावा दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी केला आहे
 

Web Title: During the music launch, the actress directed the director to slap