'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती, नकार दिल्यानंतर मंदिकीनीची लागली होती वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:04 PM2021-10-21T20:04:22+5:302021-10-21T20:07:53+5:30

'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी इंसाफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

Do you know, Ram Teri Ganga Meli's Directors First Choice was Padmini Kolhapure Instead Of Mandakini | 'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती, नकार दिल्यानंतर मंदिकीनीची लागली होती वर्णी

'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती, नकार दिल्यानंतर मंदिकीनीची लागली होती वर्णी

googlenewsNext

पद्मिनी कोल्हापूरे... हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे 80च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. मात्र पद्मिनी कोल्हारपूरे या अभिनयाच्या क्षेत्रात अपघातानेच आल्या.

 

आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याप्रमाणे गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. फक्त नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात सिनेमा आणि अभिनयच त्यांचं जणू आयुष्य बनलं. 'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी इंसाफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. यानंतर पद्मिनी कोल्हापूरे अभिनय आणि सिनेमात रमल्या. विविध सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. 

कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना 'राम तेरी गंगा मैली', 'एक दूजे के लिए', 'सिलसिला' अशा सिनेमांच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला. एका टीव्ही शो दरम्यान पद्मिनी कोल्हापूरे यांनी याबाबत खुलासा केला होता. या सुपरडुपर ठरलेल्या सिनेमांना नकार दिल्याचा पश्चात होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. जर वेळ मागे नेणं शक्य झालं असतं तर त्यावेळी नकार दिलेल्या सिनेमात काम केलं असतं असंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे यांनी नकार दिलेले सगळे सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरले आहेत.  या खास शोमधून प्रसिद्ध सेलिब्रिटींचं आयुष्य आणि जीवनप्रवास उलगडतो. प्रसिद्ध लेखक सलीम खान, बप्पी लाहिरी, सुभाष घई, झीनत अमान, कुमार सानू यांचं जीवन उलगडलं आहे. 
 

Web Title: Do you know, Ram Teri Ganga Meli's Directors First Choice was Padmini Kolhapure Instead Of Mandakini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.