‘कोणत्याही भूमिकेत अडकायचे नाहीये’

By Admin | Published: April 5, 2017 03:04 AM2017-04-05T03:04:09+5:302017-04-05T03:04:09+5:30

सीतेच्या भूमिकेत झळकलेली मदिराक्षी मुंडळे जाट की जुगनीमध्ये प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.

'Do not get involved in any role' | ‘कोणत्याही भूमिकेत अडकायचे नाहीये’

‘कोणत्याही भूमिकेत अडकायचे नाहीये’

googlenewsNext

- प्राजक्ता चिटणीस
सिया के राम या मालिकेत सीतेच्या भूमिकेत झळकलेली मदिराक्षी मुंडळे जाट की जुगनीमध्ये प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तिच्या या नवीन इनिंगबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...
सिया के राम या मालिकेतनंतर तू आता एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहेस, याचे कारण काय?
सिया के राम ही एक पौराणिक मालिका
होती आणि त्या मालिकेत मी सिता या प्रमुख भूमिकेत झळकले होते. या मालिकेनंतर मला पौराणिक मालिका करायची नाही असे मी ठरवले होते. या भूमिकेपेक्षा अगदी विरुद्ध भूमिकेच्या मी शोधात होते. सिया के राम ही मालिका संपल्यानंतर मला अनेक मालिकांच्या आॅफर्स येत होत्या; पण मी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असल्याने मालिकांना नकार
देत होते. मला एकाच इमेजमध्ये अडकायचे नव्हते. एक कलाकार म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे, असे मला वाटते.

एखादी पौराणिक मालिका केल्यानंतर कलाकार त्याच भूमिकेत अडकतो असे म्हटले जाते, याविषयी तुझे काय मत आहे?
पौराणिक मालिकाच काय तर कोणतीही डेली सोप केल्यानंतर कित्येक महिने तरी तीच भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहाते. प्रेक्षक तुम्हाला तुमच्या नावाने नव्हे, तर त्या भूमिकेच्या नावाने ओळखतात. तुम्ही ज्या वेळी पौराणिक मालिका करता, त्या वेळी तर प्रेक्षक इमोशनलीदेखील तुमच्याशी जोडलेले असतात. लोक तुमच्यासोबत त्या भूमिकेवरदेखील प्रचंड प्रेम करतात. पौराणिक मालिकेतील एखाद्या व्यक्तिरेखेची छबी प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्षं बसलेली असते. प्रेक्षक तुम्हालादेखील त्याच व्यक्तिरेखेत पाहायला लागतात. त्यामुळे त्या भूमिकेतून बाहेर पडायला नक्कीच वेळ लागतो.

जाट की जुगनी ही मालिका स्वीकारण्याचा विचार कसा केलास?
पौराणिक मालिकेत काम केल्यानंतर मदिराक्षीच्या जवळपास जाणारी एखादी भूमिका मला करायची होती आणि या मालिकेतील माझी मुन्नी ही व्यक्तिरेखा खूपशी माझ्यासारखीच असल्याने मी या मालिकेला होकार दिला. या मालिकेद्वारे एक चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, मला स्वत:ला पंजाबी ड्रेसेस घालायला खूप आवडतात आणि या मालिकेत मी पंजाबी पेहरावातच दिसणार आहे.
या मालिकेत प्रेमविवाहावर भाष्य केले जाणार आहे. आजही आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध केला जातो, त्याच्याबद्दल काय सांगशील?
हरियाणामधील एका समाजावर आमच्या मालिकेत भाष्य केले जाणार आहे. पण केवळ हरियाणाच नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांत आजही जात, धर्म या गोष्टींमुळे प्रेमविवाहाला विरोध केला जातो. कोणतीच जात, धर्म प्रेमाच्या आड येता कामा नये, असे मला वाटते.

Web Title: 'Do not get involved in any role'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.