कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:57 IST2025-05-13T10:56:53+5:302025-05-13T10:57:54+5:30
विराट कोहलीसाठी दिग्दर्शकाची खास पोस्ट, जाणून घ्या सविस्तर

कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने १२ मे २०१५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याच्या संदर्भात खास प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने विराटसाठी एक खास पोस्ट लिहिली असून एक दुर्मिळ आणि आतापर्यंत न पाहिलेला फोटो शेअर केला आला आहे.
अनुराग कश्यपनेविराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील प्रवासाचं अविश्वसनीय म्हणत कौतुक केलं आहे. कोहलीच्या निवृत्तीनंतर अनुराग चांगलाच भावूक झाल्याचे दिसून आलं. अनुराग कश्यपने सोशल मीडियावर शेअर केलेला विराट कोहलीचा हा फोटो त्याच्या सुरुवातीच्या काळातील आहे.
या फोटोमध्ये विराट हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पांढरी जर्सी आणि लाल टोपीमध्ये दिसतोय. फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "हा तरुण पुढे जाऊन खेळपट्टीवर आणि आपल्या मनावर राज्य करत राहिला. चॅम्प तुला खूप प्रेम. कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच तुझी आठवण येईल". अनुरागनं हार्ट इमोजीसह विराटला ही पोस्ट टॅगदेखील केली आहे.
अनुरागने शेअर केलेल्या या फोटोत विराटाच्या चेहऱ्यावरील निरागसपणा दिसून येतोय. क्रिकेट लीजेंडचा असा गोड फोटो पाहिल्यानंतर चाहते खूश झालेत. यावर काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. विराटचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान, अनुरागसह मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी विराटसाठी पोस्ट शेअर केली आहे.