कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:19 IST2025-09-17T16:18:29+5:302025-09-17T16:19:09+5:30

कॅन्सरवर उपचार घेताना दीपिकाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. किमोथेरेपीमुळे अभिनेत्रीचे केसही प्रचंड गळत असल्याचं दीपिकाने नुकत्याच केलेल्या व्लॉगमधून सांगितलं आहे. 

dipika kakar battling with liver cancer facing huge hairfall due to cancer treatment side effects | कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."

कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला काही महिन्यांपूर्वीच स्टेज २ लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. सध्या दीपिका कॅन्सरशी सामना करत असून त्यावर उपचार घेत आहे. याचे अपडेट्स ती व्हिडीओतून चाहत्यांना देत असते. कॅन्सरवर उपचार घेताना दीपिकाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. किमोथेरेपीमुळे अभिनेत्रीचे केसही प्रचंड गळत असल्याचं दीपिकाने नुकत्याच केलेल्या व्लॉगमधून सांगितलं आहे. 

दीपिका या व्हिडीओत म्हणते की "आज रविवार होता तर मी आज संपूर्ण दिवसभर आराम केला. कारण मला खूप लो फिल होत होतं. हे सगळे ट्रीटमेंटचे साइडइफेक्ट आहेत. माझे केस खूप गळत आहेत. हे खूपच भयानक आहे. खूप जास्त केसगळीत होत आहे. जेव्हा मी अंघोळ करून बाहेर येते त्यानंतर १०-१५ मिनिटे मी गप्प असते. कोणासोबत बोलत नाही. कारण, केस गळणं हे माझ्यासाठी भीतीदायक आहे. मी शोएबच्या व्लॉगमधून आधीच माझ्या रिपोर्ट्सबद्दल सांगितलं आहे. ३ महिन्यांनंतर केलेले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत". 

दरम्यान, दीपिकाला मे महिन्यात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात गेल्यातनंतर कॅन्सर असल्याचं तिला समजलं. त्यानंतर जून महिन्यात दीपिकाची सर्जरी करण्यात आली. १४ तास ही सर्जरी सुरू होती. 

Web Title: dipika kakar battling with liver cancer facing huge hairfall due to cancer treatment side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.