Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 20:39 IST2025-11-24T20:35:21+5:302025-11-24T20:39:55+5:30
कोहलीनं सोशल मीडियावरील पोस्टसह व्यक्त केलं दु:ख

Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
Cricketers Emotional Post On Actor Dharmendra Death : हिंदी सिनेसृष्टीत आपली अनोखी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट करत देओल कुटुंबियांसोबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीनं सोशल मीडियावरील पोस्टसह व्यक्त केलं दु:ख
Today, we have lost a legend of Indian cinema who captivated hearts with his charm and his talent. A true icon who inspired everyone who watched him. May the family find strength in this tough time. My sincere condolences to the whole family. 🙏🙏
— Virat Kohli (@imVkohli) November 24, 2025
विराट कोहलीनं अधिकृत एक्स अकाउंटवरुन पोस्ट शेअर करताना लिहिलंय की,
आज आपण भारतीय सिने सृष्टीतील एका महान कलावंताला गमावलं आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनय कौशल्याने त्यांनी असंख्य मनं जिंकली. चाहत्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियां मनःपूर्वक संवेदना.
अशा आशयाच्या शब्दांत विराट कोहलीनं धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सचिन तेंडुलकरनं जुन्या आठवणींना दिला उजाळा, "ते मला नेहमी म्हणायचे की,...
I, like many others, took an instant liking to Dharmendra ji, the actor, who entertained us with his versatility. That on-screen bond became stronger off-screen when I met him.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 24, 2025
His energy was incredibly infectious, and he would always tell me, “Tumko dekhkar ek kilo khoon badh… pic.twitter.com/A8CmgR9WkW
सचिन तेंडुलकर याने धरमपाजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना लिहिलंय की,
इतरांप्रमाणे, माझ्या मनात देखील धर्मेंद्रजींबद्दल क्षणात आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यांच्या बहुमुखी अभिनयाने त्यांनी आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्यासोबतच नातं अधिक घट्ट झालं. त्यांच्यात कमालीची ऊर्जा होती. ते मला नेहमी म्हणायचे, "तुम्हें देखकर एक किलो खून बढ़ जाता है मेरा." आता त्यांच्या जाण्याने "मेरा दस किलो खून कम हो गया हैं" अशी भावना मनात दाटून आली आहे.
अशा शब्दांत भावूक पोस्ट शेअर केली आहे. धर्मेंद्रजी तुम्ही आठवण येईल, असा उल्लेखही त्याने या पोस्टमध्ये केल्याचे दिसते.
युवी-भज्जीसह धवननेही शेअर केली खास पोस्ट
You stood tall, not just in stature, but in spirit.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2025
Dharmendra ji, thank you for showing us strength can be kind.
Om Shanti 🙏 pic.twitter.com/aruEYqtcHk
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरशिवाय शिखर धवन, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनीही सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या मनातील भावना बोलून दाखवत दु:ख व्यक्त केले आहे.
Every home had a favourite Dharmendra film. He was a part of our growing up and of Indian cinema’s finest years.
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 24, 2025
He brought strength, charm and honesty to every role, and carried Punjab’s warmth wherever he went.
Behind the fame was a humble, grounded and deeply human soul.… pic.twitter.com/116K0XHuP5
Heartfelt tribute to Dharmendra Ji — a timeless icon whose grace, strength, and unparalleled charm have left an everlasting mark on Indian cinema. From his powerful performances to his warmth both on and off screen, he touched countless hearts and inspired generations.
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 24, 2025
His films,… pic.twitter.com/pfgQlDkQsE