पूर्व प्रियकरांशी दीपिकाची यारियां...

By Admin | Updated: September 14, 2016 04:07 IST2016-09-14T04:07:16+5:302016-09-14T04:07:16+5:30

प्रेमात असल्यावर प्रियकर-प्रेयसीशिवाय जगणे अशक्य वाटते. परंतु प्रेमात दुरावा आल्यावर ते जोडीदार मात्र नकोसे होऊन जातात.

Deepika's journey to ex-lover ... | पूर्व प्रियकरांशी दीपिकाची यारियां...

पूर्व प्रियकरांशी दीपिकाची यारियां...

प्रेमात असल्यावर प्रियकर-प्रेयसीशिवाय जगणे अशक्य वाटते. परंतु प्रेमात दुरावा आल्यावर ते जोडीदार मात्र नकोसे होऊन जातात. मात्र दीपिका असे नाही मानत. ती अजूनही तिच्या सर्व पूर्व प्रियकरांशी नाते टिकवून आहे. आता प्रेम जरी नसले तरी एक्स बॉयफे्रंड्सशी तिची मैत्री कायम आहे. निहार पांड्या, युवराज सिंग, रणबीर कपूर या सर्वांसोबत दीपिका अजूनही कनेक्टेड आहे. ती म्हणते, प्रेम संपले म्हणजे मैत्री संपत नसते. व्यक्तीशी असलेल्या केवळ नात्याचे नाव बदलते. त्यामुळे ‘एक्स’ ही संकल्पनाच मला बरोबर वाटत नाही. इंडस्ट्रीमध्ये अगदी सुरुवातीला दीपिका आणि निहार रिलेशनशिपमध्ये होते. तिने नुकतीच युवराजसाठी असलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रणबीरसोबतच्या बहुचर्चित बे्रक-अपनंतरही दोघांनी चित्रपटांत एकत्र काम केले.

Web Title: Deepika's journey to ex-lover ...