दीपिकाच्या करिअरचा सीक्रेट प्लॅन!

By Admin | Updated: August 10, 2016 01:56 IST2016-08-10T01:56:22+5:302016-08-10T01:56:22+5:30

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटाचे शूटिंग संपले आणि दीपिका पदुकोण मुंबईत परतली. लवकरच ती ‘पद्मावती’ या बॉलिवूडपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

Deepika's Career Career Plan! | दीपिकाच्या करिअरचा सीक्रेट प्लॅन!

दीपिकाच्या करिअरचा सीक्रेट प्लॅन!

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटाचे शूटिंग संपले आणि दीपिका पदुकोण मुंबईत परतली. लवकरच ती ‘पद्मावती’ या बॉलिवूडपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. यानंतर तिचा करिअर प्लॅन काय असणार? ती हॉलिवूडवर लक्ष केंद्रित करणार की बॉलिवूडवर? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते. एका इव्हेंटमध्ये खुद्द दीपिकानेच या प्रश्नांची उत्तरे दिलीत. हॉलिवूड आणि बॉलिवूड असा काहीही भेद मी करत नाही. माझ्यासाठी चित्रपट आणि भूमिका एवढेच महत्त्वाचे आहे. केवळ भाषेचा फरक असल्याने काहीही बदलत नाही. त्यामुळेच माझ्यासाठी हॉलिवूड वा बॉलिवूड दोन वेगळ्या गोष्टी नाहीत तर माझ्या करिअरमधील टप्पे आहेत. उद्या माझ्याकडे साऊथ इंडियन चित्रपट चालून आला आणि कथा व भूमिका आवडलीच तर मी तोही करेल, असे हटके उत्तर दीपिकाने दिले. एकंदर काय तर तिच्या करिअरची गाडी आता थांबणार नाही, एवढंच खरं!

Web Title: Deepika's Career Career Plan!