दीपिकाला किस करताना त्यात सेक्सची भावना प्रबळ होती - रणवीर

By Admin | Updated: November 16, 2016 13:23 IST2016-11-16T12:49:57+5:302016-11-16T13:23:39+5:30

हॉट चुंबन दृश्यांनी भरलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या 'बेफिक्रे' चित्रपटातील आणखी एक गाणे मंगळवारी लाँच झाले.

Deepika did not know when to make her sexuality strong - Ranveer | दीपिकाला किस करताना त्यात सेक्सची भावना प्रबळ होती - रणवीर

दीपिकाला किस करताना त्यात सेक्सची भावना प्रबळ होती - रणवीर

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १६ - हॉट चुंबन दृश्यांनी भरलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या 'बेफिक्रे' चित्रपटातील आणखी एक गाणे मंगळवारी लाँच झाले. यू अँड मी हे गाणे रणबीर आणि वाणीने लाँच केले. यावेळी पत्रकारांनी दोघांवर प्रश्नांची सरबत्ती केली.  रणबीरनेही आपल्या शैलीत या प्रश्नांना उत्तरे दिली. 
 
मिस मालिनी डॉट कॉमच्या वृत्तानुसार एका पत्रकाराने मात्र वेगळाच प्रश्न विचारुन रणबीरची चांगलीच पंचाईत केली. रामालीलामध्ये गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण आणि बेफिक्रेमध्ये वाणी कपूरबरोबरच्या किसींग सीन्समध्ये काय फरक होता असा प्रश्न विचारला. दुसरा एखादा हिरो असता तर त्याने स्पष्ट उत्तर टाळून वेळ मारुन नेली असती. पण रणवीरने मात्र दोन्ही चित्रपटातल्या किसींग सीन्समधला फरक समजावला.  
 
आणखी वाचा 
'बेफिक्रे'च्या नव्या गाण्यात रणवीर-वाणीचा बोल्ड अंदाज
'हार्पर बाजार ब्राइड'च्या कव्हर पेजवर रणवीर आणि वाणीचा हॉट लूक
 
रामलीलामधील अंग लागा दे गाण्यातील दीपिका बरोबरच्या चुंबन दुश्यामध्ये उत्तेजना, सेक्स आणि आवेशाने भरलेले होते. तेच बेफिक्रेमध्ये वाणीबरोबरच्या चुंबनामध्ये प्रेमाचा ओलावा आहे. आता चित्रपट बघून तुम्हीच ठरवा रणबीरच्या म्हण्यात कितपत तथ्य आहे. 

Web Title: Deepika did not know when to make her sexuality strong - Ranveer