दीपाली सय्यदचे हिंदीत पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 02:34 AM2016-01-31T02:34:02+5:302016-01-31T02:34:02+5:30

मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे, लाडीगोडी, उचला रे उचला, वेलकम टू जंगल, ढोलकीच्या तालावर अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली अभिनेत्री म्हणजे

Deepali Sayyed's debut in Hindi | दीपाली सय्यदचे हिंदीत पदार्पण

दीपाली सय्यदचे हिंदीत पदार्पण

googlenewsNext

मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे, लाडीगोडी, उचला रे उचला, वेलकम टू जंगल, ढोलकीच्या तालावर अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली अभिनेत्री म्हणजे दीपाली सय्यद. बंदिनी, दूर्वा या मालिकांतही तिचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता ही मराठमोळी अभिनेत्री चक्क हिंदी चित्रपटात पदार्पण करीत आहे. फुलेना नाइट्स असे या चित्रपटाचे नाव असून त्यात ती मुख्य भूमिका साकारत आहे.
दीपाली सय्यद तिच्या भूमिकेबद्दल सांगते, फुलेना हा बिहारमधील एक नौटंकीचा प्रकार आहे. यामध्ये मुलं मुली बनून नाचतात आणि एका वयानंतर तो मुलगी होऊ शकत नाही, म्हणून ते जोकर होतात. यामध्ये मी त्या माणसाच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्या वेळी अशा नवऱ्याची बायको असताना, जो स्त्रीची भूमिका साकारतो त्याला सांभाळून घेते आणि दुसरीकडे गावकऱ्यांना, मुखियालाही कशा प्रकारे सामोरी जाते आणि त्याचं वय झाल्यानंतर त्या जोकराचं आयुष्य कसं जगतं, हे या चित्रपटात पाहायला मिळेल.

Web Title: Deepali Sayyed's debut in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.