सनी लिओनीने नवरोबाची अशी घेतली मजा, पाहून खो-खो हसाल...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:50 PM2020-05-04T15:50:10+5:302020-05-04T15:50:21+5:30

पाहा व्हिडीओ...

daniel weber believed sunny leone accidentally chopped off her finger watch her prank video-ram | सनी लिओनीने नवरोबाची अशी घेतली मजा, पाहून खो-खो हसाल...!!

सनी लिओनीने नवरोबाची अशी घेतली मजा, पाहून खो-खो हसाल...!!

googlenewsNext
ठळक मुद्देसनी सर्रास घरात अशा गमतीजमती करत असते. मुलांसोबतही ती धम्माल मस्ती करते. 

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या लॉकडाऊनमुळे घरात वेळ घालवतेय. अर्थात तिचा अर्धा वेळ सोशल मीडियावर जातो. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते. आता तिने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. होय, सनीने पती डेनिअर वीबरची चांगलीच फिरकी घेतली. तर आता सनीने असे काय ते तरी वाचा...

किचनमध्ये काम करत सनीला नव-याची फिरकी घेण्याची कल्पना सुचली अन् ती कामाला लागली. तिने काय करावे तर सूरीने बोट कापल्याचे नाटक रचले. याचाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत आधी ती सगळी तयारी करते. म्हणजे, सूरीने बोट तुटून वेगळे पडले आहे, हात रक्तबंबाळ झालाय, वगैरे वगैरे... ही सर्व तयारी झाल्यावर सनी  जोरजोरात ओरडू लागते. तिच्या किंचाळ्या ऐकून तिचा पती डेनिअल धावत किचनमध्ये येतो आणि सनीचा हात रक्तबंबाळ बघून अक्षरश: कावराबावरा होतो. सनीचे एक बोट तुटून वेगळे झाले पाहून तर तो इतका घाबरतो की, क्षणभर काय करावे हेच त्याला सुचत नाही. अशात किचनमध्ये एक कपडा त्याला दिसतो आणि तो उचलून डेनिअल सनीच्या जखमेवर गुंडाळतो. पण इतक्यात  सनी हसायला लागते आणि हे सगळे नाटक असल्याचे डेनिअलला कळते़=. यानंतर काय होते, ते तुम्हीच बघा.

सनी सर्रास घरात अशा गमतीजमती करत असते. मुलांसोबतही ती धम्माल मस्ती करते. असे अनेक व्हिडीओ तिच्या सोशल अकाऊंटवर आहेत.
तुम्हाला माहित आहेच की, सनी तीन मुलांची आई आहे. सरोगेसीद्वारे सनीने अशर व नोह या दोन जुळ्यांना जन्म दिला होता. त्यापूर्वी 2017 मध्ये सनीने लातूरमधून एका मुलीला दत्तक घेतले होते.

Web Title: daniel weber believed sunny leone accidentally chopped off her finger watch her prank video-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.